कोहळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कोहळा, साखर, दूध, तूप, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स, खोबराकीस आणि तांदूळ हे साहित्य लागेल.
कोहळ्याची खीर बनवण्याची कृती
सर्वात आधी कोहळ्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्यातील बिया सुद्धा काढून घ्यायच्या आहेत. नंतर कोहळ्याचे काप करून घ्यायचे आहेत. कोहळ्याचे काप आणि तांदळाचे दाणे शिजायला ठेवायचे आहेत. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये कोहळा आणि तांदळाचे दाणे शिजून तयार होतात. त्यानंतर त्या कोहळ्यातील पाणी काढून घ्यायचे आहे. कोहळा थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे.
advertisement
महिलांनी दारू प्यावी की नाही ? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम? video
त्यानंतर खीर बनवण्यासाठी गॅसवर एका भांड्यात तूप टाकून घ्यायचे आहे. त्याच तुपामध्ये ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला कोहळा टाकून घ्यायचा आहे. पाच मिनिटे ते तुपामध्ये शिजवून घ्यायचे. नंतर त्यामध्ये साखर टाकून घ्यायची. साखर टाकल्यानंतर त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात वेलची पूड आणि दूध टाकायचे आहे. दूध टाकल्यानंतर सुद्धा एक उकळी काढून घ्यायची आहे. कोहळ्याची खीर तयार झालेली असेल. त्यामध्ये आता खोबराकीस आणि ड्रायफ्रूट्स टाकून ही खीर खाण्यासाठी तयार आहे. पुरीसोबत कोहळ्याची खीर अतिशय टेस्टी लागते.





