TRENDING:

जुनी द्या, नवी घ्या! Olaचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ 

Last Updated:

Ola Electric ने आपल्या जुन्या Gen-1 आणि Gen-2 ग्राहकांसाठी मोठं सरप्राइज दिलं आहे. आता ती लेटेस्ट Gen-3 स्कूटर्स आणि बाईक्समध्ये अपग्रेड करु शकता. ज्यामध्ये 4680 Bharat Cell आणि 320KM पर्यंत रेंज मिळते. हे पाऊल कंपनीला पुन्हा मार्केट लीटर बनवू शकेल का? चला पाहूया डिटेल्स...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशातील प्रसिद्ध EV टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या सध्याच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांची संतुष्टी वाढवण्याच्या उद्देशाने एक नवीन जेन-3 अपग्रेड प्रोग्राम सुरु केला आहे. कंपनीचे फाउंडर आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी नुकत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर याची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, आम्ही आपल्या जेन-1 आणि जेन-2 ग्राहकांसाठी अपग्रेड प्रोग्राम लॉन्च करत आहत. जेणेकरुन आमच्या जेन-3 प्रोडक्ट्सवर शिफ्ट करु शकतील. ज्यामध्ये 4680 व्हर्जनचाही समावेश आहे. हे बंगळुरुमधून या वीकेंडपासून सुरू होत आहे.
ओला इलेक्ट्रिक जेन-३
ओला इलेक्ट्रिक जेन-३
advertisement

ही योजना जुन्या ओला जेन-1 किंवा जेन-2 मॉडेल्स असलेल्या ग्राहकांसाठी आहे. ते आता कंपनीच्या प्रगत जेन-3 प्लॅटफॉर्मवर अपग्रेड करू शकतात. उपलब्ध मॉडेल्समध्ये S1 Pro, S1 Pro+ आणि S1X जेन-3 स्कूटर्सचा समावेश आहे, तर रोडस्टर, रोडस्टर X आणि रोडस्टर X+ बाईक्स उपलब्ध आहेत.

जेन-3 मॉडल्समध्ये काय खास?

यामध्ये ओलाची स्वदेशी 4680 ‘भारत सेल’ बॅटरी टेक्नॉलॉजीचे प्रीमियम व्हेरिएंट्सही उपलब्ध आहेत. जेन-3 मॉडल्समध्ये मिड-ड्राइव्ह मोटर, चेन-ड्राइव्ह सिस्टम, चांगली एफिशिएन्सी आणि ड्यूरेबिलिटी सारख्या हार्डवेयर सुधारणांचा समावेश आहे. काही मॉडल्समध्ये रायडिंग रेंज 320 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते. या व्यतिरिक्त MoveOS सॉफ्टवेयर अपडेट्सने रायडिंग एक्सपीरियन्स आणि ओनरशिप जास्त सोपी आणि स्मार्ट झाली आहे.

advertisement

रोडवर काढलेल्या पांढऱ्या रेषांचा अर्थ काय? 90% लोकांना माहितीच नाही

कंपनीचा मास्टर प्लॅन!

ही अपग्रेड योजना ओला इलेक्ट्रिकसाठी एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पाऊल आहे, कारण कंपनी सध्या असंख्य आव्हानांना तोंड देत आहे. 2024 च्या अखेरीस एकेकाळी 36 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेतील हिस्सा असलेल्या ओलाचा आता फक्त 4-6 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो सारख्या कंपन्यांचे बाजारपेठेवर 60 टक्क्यांहून अधिक नियंत्रण आहे. ग्राहकांच्या तक्रारी प्रामुख्याने सर्व्हिस डिले, सुटे भागांची उपलब्धता आणि विश्वासार्हतेशी संबंधित आहेत. कंपनीवरही आर्थिक परिणाम झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत महसूल निम्म्यावर आला, ज्यामुळे ₹490 कोटींचे नुकसान झाले.

advertisement

हे मुद्दे दूर करण्यासाठी ओलाने 'स्ट्रक्चरल रीसेट' ची सुरुवात केली आहे. कंपनी आपल्या फिजिकल स्टोर्सची संख्या मार्च 2026 पर्यंत कमी करुन 550 करत आहे, जी पहिले 700 होती.सोबतच 'हायपरसर्व्हिस' सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत. जिथे 80 टक्के सर्व्हिस रिक्वेस्ट्स त्याच दिवशी पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. सर्व्हिस बॅकलॉग 50 टक्के कमी झाले आहे. अपग्रेड प्रोग्राम याच व्यापक रणनीतिचा भाग आहे. जे जुन्या ग्राहकांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि चांगला परफॉर्मेंस देऊन त्यांना कंपनीसोबत जोडून ठेवेल.

advertisement

28 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी अन् किंमतही कमी! कमी पगार असेल तरी घरी येईल SUV, 5 बेस्ट मॉडेल!

ओलाचा युग परत येणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

तज्ञांच्या मते ही योजना ग्राहकांची निष्ठा वाढवण्यास मदत करेल. यासोबतच, अपग्रेडचे अचूक एक्सचेंज मूल्य, डिस्काउंट किंवा पेमेंट डिटेल्स अद्याप जाहीर केलेले नाहीत. बेंगळुरूमध्ये लाँच केलेले, ते इतर शहरांमध्ये विस्तारण्याची शक्यता आहे. ओला इलेक्ट्रिकचा असा विश्वास आहे की पीएलआय प्रमाणपत्र आणि प्रगत बॅटरी तंत्रज्ञानासह जेन-3 प्लॅटफॉर्म कंपनीला बाजारपेठेतील त्याचे नेतृत्व परत मिळवण्यात मदत करेल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
जुनी द्या, नवी घ्या! Olaचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल