advertisement

Tata ची 6 लाखांची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट? Video

Last Updated:

एक म्हणजे Toyota Urban Cruiser EV आणि दुसरी म्हणजे Tata Punch EV. या दोन्ही गाड्यांमध्ये नेमकं काय खास आहे, रेंज किती मिळते, फीचर्स काय आहेत आणि किंमत किती आहे, हे समजून घेऊया.

+
टाटा

टाटा पंच की टोयोटाची अर्बन क्रूझर ईबेला – EV कार सेगमेंटमध्ये कोण ठरते अव्वल? फीचर्स, रेंज आणि किंमत जाणून घेऊया!

मुंबई: नवीन गाडी घ्यायची म्हटलं की आजकाल आपण थेट हायब्रीड किंवा ईव्ही कारकडे पाहतो. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, कमी खर्चात चालणारी गाडी आणि भविष्यासाठी चांगला पर्याय म्हणून अनेकजण आता इलेक्ट्रिक कार निवडत आहेत. अशातच दोन मोठ्या कंपन्यांनी आपल्या दमदार इलेक्ट्रिक SUV बाजारात आणल्या आहेत. एक म्हणजे Toyota Urban Cruiser EV आणि दुसरी म्हणजे Tata Punch EV. या दोन्ही गाड्यांमध्ये नेमकं काय खास आहे, रेंज किती मिळते, फीचर्स काय आहेत आणि किंमत किती आहे, हे समजून घेऊया.
रेंज आणि बॅटरी पॉवर
सर्वप्रथम टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनीची भारतातील इलेक्ट्रिक सेगमेंटमधील महत्त्वाची SUV आहे. या गाडीत 50 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून एका पूर्ण चार्जवर सुमारे 500 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. ही SUV फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते, ज्यामुळे कमी वेळात मोठ्या प्रमाणात चार्जिंग होते. शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरमुळे स्मूथ आणि शांत ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. ही गाडी प्रीमियम इलेक्ट्रिक SUV म्हणून सादर करण्यात आली आहे.
advertisement
दुसरीकडे टाटा पंच ईव्हीने भारतीय बाजारात वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे ही भारतातील पहिली SUV आहे ज्यामध्ये लाइफटाइम बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे. यामध्ये 25 kWh आणि 35 kWh असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. लाँग रेंज व्हेरियंटमध्ये सुमारे 400 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. ही SUV केवळ 26 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज होते, ही मोठी जमेची बाजू आहे. याशिवाय या गाडीची पाण्यातील चाचणी आणि विविध रस्त्यांवरील कठीण परिस्थितीत टेस्ट करण्यात आली आहे. चांगले ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे खराब रस्त्यांवरही ही गाडी सक्षम ठरते.
advertisement
फिचर्स
फीचर्सच्या बाबतीत टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, 360 डिग्री कॅमेरा, मल्टी ड्राईव्ह मोड्स, व्हेंटिलेटेड सीट्स आणि सहा एअरबॅग्ससह प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. केबिन स्पेस मोठी असून प्रीमियम इंटीरियर ही याची खासियत आहे.
टाटा पंच ईव्हीमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, व्हॉइस असिस्टंट, मोबाईल अॅपद्वारे गाडी कंट्रोल करण्याची सुविधा, 360 डिग्री कॅमेरा आणि सहा एअरबॅग्स यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. सेफ्टीच्या बाबतीत ABS, EBD आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
advertisement
किंमत
किंमतीबाबत बोलायचे झाले तर टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीची किंमत सुमारे 20 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे आणि बुकिंग रक्कम 25 हजार रुपयांपासून सुरू होते. तर टाटा पंच ईव्हीची किंमत 9.70 लाख रुपयांपासून सुरू होऊन 12.50 लाख रुपयांपर्यंत जाते. टाटा पंच ईव्ही विविध व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, तर टोयोटाची ही SUV देखील वेगवेगळ्या ट्रिम्समध्ये बाजारात उपलब्ध आहे.
advertisement
एकूणच पाहता, जास्त रेंज आणि प्रीमियम अनुभव हवा असल्यास टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही योग्य पर्याय ठरते. मात्र कमी किंमत, लाइफटाइम बॅटरी वॉरंटी आणि जलद चार्जिंग सुविधा लक्षात घेतली तर टाटा पंच ईव्ही अनेकांसाठी जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Tata ची 6 लाखांची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट? Video
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement