वेस्पा ऑफिसीना 8 ची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये (एक्स-शोरुम, महाराष्ट्र) आहे. ती 125cc आणि 150cc दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 125cc व्हेरिएंटची बेस प्राइज 1.34 लाख रुपये आहे. तर 150cc व्हेरिएंटमध्ये थोडा प्रीमियम असेल. ती निवडक वेस्पा डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. सोबतच स्कूटरसह मॅचिंग हेलमेंट स्टँडर्ड दिला आहे. या व्यतिरिक्त ब्रांडेड मर्चंडाइज सारखे टॉप बॉक्स, विंडब्रेकर, हुडी, टी-शर्ट, बॅकपॅक आणि चेनही उपलब्ध आहे.
advertisement
₹8.80 लाखांच्या या 7-सीटर MPV साठी शोरुममध्ये रांगा! देते 26.11 km मायलेज
डिझाइन
ऑफिसिना 8 ची रचना पूर्णपणे औद्योगिक आणि रेट्रो-प्रेरित आहे. यात मॅट मेटॅलिक ब्लू ऑफिसिना 8 रंगात रंगवलेले स्टील बॉडी आहे. मूळ वर्कशॉप टूल्स, यंत्रसामग्री आणि वर्कवेअरपासून प्रेरित होऊन हा रंग विशेषतः या व्हर्जनसाठी तयार करण्यात आला आहे. डिझाइनमध्ये मेटॅलिक रिवेट्स, पितळ आणि अॅल्युमिनियम टोनचा वापर केला आहे, ज्यामुळे ते एक यूनिक, फंक्शनल आणि क्राफ्टेड लूक देते.
ही सामान्य स्कूटर नाही. तर एक हेरिटेज पीस दिसते. क्लासिक वेस्पा स्टाइल जसं राउंड हेडलँप, क्रोम एलिमेंट्स आणि स्लीक बॉडी लाइन्स कायम आहेत. पण स्पेशल एडिशन टचसह येते. ती सिंगल कलर ऑप्शनमध्ये येते. जी तिला आणखी एक्सक्लूसिव्ह बनवते.
Tata Sierra किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? जाणून घ्या EMIचा हिशोब
फीचर्स
यांत्रिकदृष्ट्या, हे स्टँडर्ड व्हेस्पा 125 आणि 150 मॉडेल्ससारखेच आहे. यात कोणतेही मोठे बदल नाहीत, परंतु स्पेशल एडिशन असल्याने, त्यात काही अतिरिक्त टच आहेत. स्टँडर्ड फीचर्समध्ये डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी लाइटिंग (हेडलॅम्प, टेललाइट), फ्रंट डिस्क ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक आणि एबीएस (काही प्रकारांमध्ये) यांचा समावेश आहे. रुंद सीट आणि चांगली पकड असलेले रायडिंग पोश्चर आरामदायी आहे.
इंजिन आणि परफॉर्मेंस
याच्या 125cc व्हेरिएंटमध्ये 124.45cc सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड इंजन आहे. जे जवळपास 10.4 hp पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क जनरेट करते. तसंच 150cc मध्ये 149.5cc इंजिन आहे. जे जास्त पॉवरफूल आहे. जवळपास 10.8 hp आणि चांगले टॉर्क देते. दोन्हीमध्ये BS6-compliant इंजिन आहे. जी स्मूद आणि रिफाइंड परफॉर्मेंस देते. ट्रान्समिशन CVT ऑटोमॅटिक आहे. ही शहराची रायडिंग आणि हायवे दोन्हीसाठी चांगली आहे. फ्यूल टँक कॅपेसिटी जवळपास 7-8 लिटर आणि मायलेज 40-45 KMPL च्या आसपास आहे.
