Tata Sierra किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? जाणून घ्या EMIचा हिशोब
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Tata Sierra On-Road Price & EMI Details: 90 च्या दशकातील आयकॉनिक SUV आता नव्या अवतारात परतली आहे. तुम्ही 11.49 लाख रुपयांपासून सुरु होणारी नवी Tata Sierra खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आधी दिल्लीमध्ये याची ऑन-रोड किंमत आणि ईएमआयचं पूर्ण गणित, फीचर्स, सेफ्टी आणि मायलेजच्या डिटेल्स जाणून घ्या...
advertisement
advertisement
Tata Sierra On Road Price : आधी सांगितल्याप्रमाणे, सिएराची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्ही ती राजधानी दिल्लीमध्ये खरेदी करत असाल तर तुम्हाला बेस व्हेरिएंटसाठी 1,26,900 रुपयांचा आरटीओ शुल्क भरावा लागेल. याव्यतिरिक्त, तुम्हाला 56,309 रुपयांचा विमा आणि 11,990 रुपयांचे इतर शुल्क भरावे लागेल. यामुळे टाटा सिएराची ऑन-रोड किंमत 13,44,199 रुपयांवर पोहोचते.
advertisement
Tata SierraDown Payment & EMI Details : तुम्हाला नवी टाटा सिएरा खरेदी करताना 2 लाख रुपये Down Payment दिली. तर उर्वरित 11,44,199 रुपयांवर तुम्हाला कार लोनसाठी अप्लाय करावं लागेल. तुमची मासिक कमाई चांगली असेल आणि क्रेडिट स्कोअर चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला 10 टक्यांच्या व्याजदरावर लोन सहज मिळू शकते.
advertisement
advertisement
इंटीरियर, फीचर्स आणि सेफ्टी : याच्या केबिनमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप आहे. यामध्ये 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 12.3 इंच सेंट्रल इंफोटेनमेंट आणि 12.3 इंचाचा को-ड्रायव्हर स्क्रिनचा समावेश आहे. पॅनोरमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड ड्रायव्हर सीट (मेमोरी फंक्शनसह) JBL 12-स्पीकर सिस्टम,वायरलेस चार्जर, ड्यूअल-झोन एसी, एम्बिएंट लायटिंग आणि बॉस मोडसारख्या सुविधा याला लग्जरी फील देतात.
advertisement
फीचर्समध्ये HypAR HUD, वायरलेस कनेक्टिव्हिटी, पॉवर्ड टेलगेट आणि मल्टी-फंक्शन स्टीअरिंग यांचा समावेश आहे. सेफ्टी फीचर्समध्ये सर्व व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESP (21+ फीचर्स), हिल होल्ड, 360° कॅमेरा, TPMS आणि L2+ ADAS सह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (22 फीचर्स) यांचा समावेश आहे.
advertisement
इंजिन आणि मायलेज : इंजिन ऑप्शनमध्ये 1.5L NA पेट्रोल (106 PS, 145 Nm), 1.5L TGDI टर्बो पेट्रोल (जवळपास 160 PS, 250-255 Nm) आणि 1.5L टर्बो डिझेल (116-118 PS, 260-280 Nm) चा समावेश आहे. त्यांना 6-स्पीड MT , AT किंवा DCT ऑप्शनमध्ये खरेदी केले जाऊ शकते. याचा जास्तीत जास्त क्लेम्ड मायलेज 20.5 kmpl आहे.
advertisement
advertisement









