तुम्ही सीएनजी कार वापरता का? जर वापरत असाल तर कारमध्ये असलेल्या सीएनजी सिलिंडरची तपासणी वेळेवरच करून घ्या. अन्यथा एखादी मोठी दुर्घटनासुद्धा होऊ शकते. याची तपासणी करण्याची एक पद्धत जाणून घेऊ या.
भारतीय नागरिकांना सीएनजी गाडी वापरणं खूप फायदेशीर वाटतं. मागच्या काही काळात सीएनजी गाड्यांची मागणी खूप वेगानं वाढली आहे. ज्या गाड्यांमध्ये पारंपरिक इंधन वापरलं जातं, त्यापेक्षा सीएनजी गाड्यांची देखभाल थोडी जास्त ठेवावी लागते. तुमच्याकडेसुद्धा सीएनजीवर चालणारी गाडी असेल तर तुम्ही तातडीनं तिच्या देखभालीबद्दल जागरूक झालं पाहिजे. काळजी न घेतल्यास गाडीत कधीही ब्लास्ट होऊ शकतो.
advertisement
सीएनजी सिलिंडर आतून कसा असतो?
खरंतर सीएनजी सिलिंडरमध्ये एक रसायन असतं. त्यामुळे सिलिंडर आतल्या बाजूने कसा आहे, हे समजू शकतं. सोप्या शब्दात सांगायचं तर यामुळे सिलिंडर कधी बदलायचा आहे, याची माहिती मिळू शकते. हे तपासण्याची एक सोपी पद्धत आहे. मेकॅनिककडे सिलिंडर नेऊन तो उलटा करावा. थोड्या वेळाने त्यातून रसायन बाहेर येईल.
रसायन सांगेल सिलिंडरचं आयुष्य
सीएनजी सिलिंडरच्या टाकीतून काळ्या रंगाचं रसायन बाहेर आलं तर एक गोष्ट ध्यानात घ्या, की तुमचा सीएनजी सिलिंडर म्हणजे एक चालता फिरता बॉम्ब बनलेला आहे. हा सिलिंडर शक्य तितक्या लवकर बदलण्याची गरज आहे. सीएनजी सिलिंडरमधून पिवळ्या रंगाचं रसायन बाहेर आलं तर समजावं की सिलिंडर सुस्थितीत आहे आणि तुम्ही तो दीर्घ काळ वापरू शकता.
हायड्रो टेस्टसुद्धा आहे आवश्यक
गाडीत बसवलेला सीएनजी सिलिंडर नेमका कोणत्या स्थितीत आहे, हे तपासण्याची एक आणखी पद्धत आहे. हायड्रो टेस्टिंग करूनही आपल्याला सिलिंडरबद्दल माहिती मिळू शकते. दर तीन वर्षांनी सीएनजी सिलिंडरची हायड्रो टेस्ट करणं आवश्यक असतं. यातून सिलिंडर हा गाडीत वापर करण्यायोग्य अवस्थेत आहे किंवा नाही, याची माहिती आपल्याला मिळते. जर एखाद्या कारच्या सिलिंडरने ही टेस्ट पास केली नाही, तर त्या गाडीतला सिलिंडर तातडीने बदलला जातो.
ही चूक कधीही करू नका
याशिवाय एक गोष्ट म्हणजे, कार कधीही जास्त काळासाठी सीएनजी मोडवर चालवू नका. सिलिंडरवरचा दबाव कमी होत असल्यानं, काही कंपन्यासुद्धा याबाबतचा सल्ला देत असतात. व्हॉल्व्ह फुटण्याचा धोकाही जास्त असतो. कालांतरानं सीएनजी गाडीचा व्हॉल्व्हसुद्धा खराब होऊ शकतो. त्यामुळे याची वेळेवर तपासणी करणं कधीही चांगलं.
