TRENDING:

अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक

Last Updated:

अमित बॅनर्जी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून अनेकजण रक्तदानासाठीही पुढे येत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : रक्तदान आणि अवयवदान या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र या दोन्ही विषयांबाबत जनजागृती ज्या प्रमाणात वाढायला हवी, त्या प्रमाणात ती अजूनही दिसून येत नाही. परिणामी भारतात अपेक्षित प्रमाणात रक्तदान आणि अवयवदान होत नाही. हीच परिस्थिती बदलण्यासाठी मूळ प्रयागराज येथील आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले अमित बॅनर्जी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून अनेकजण रक्तदानासाठीही पुढे येत आहेत. या कार्याविषयी अमित यांनी लोकल18 ला माहिती दिली आहे.
advertisement

अमित बॅनर्जी हे 1974 सालापासून रक्तदान चळवळीशी जोडले गेले आहेत. त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला रक्ताची गरज भासल्याने त्यांनी त्या काळात रक्तदान केले आणि तेव्हापासून आजपर्यंत ते या मोहिमेसाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांनी भारतभर अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करत जनजागृती केली आहे. प्रयागराज परिसरात त्यांनी पहिल्यांदा रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या काळात रक्तदानाबाबत अनेक गैरसमज असतानाही त्यांनी पुढाकार घेत काम सुरू ठेवले.

advertisement

रक्तदानासोबतच ते अवयवदानासाठीही कार्यरत असून त्यांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे अवयवदान केले आहे. तसेच इतरांनाही अवयवदानासाठी प्रेरित करत शिबिरे आयोजित करतात. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे. रक्तदानाचा चौक असावा पुण्यात रक्तदान अधिक सोपं आणि सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध व्हावं, यासाठी पुण्यात रक्तदानाचा चौक उभारण्यात यावा, अशी अनोखी संकल्पना अमित बॅनर्जी यांनी मांडली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
सर्व पहा

या चौकात नागरिकांना एका ठिकाणी रक्तदानाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे लोकांना रक्तदानासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही आणि रक्तदान करणे अधिक सोपे होईल. या ठिकाणी रक्तदानासोबतच अवयवदानाबाबतही माहिती देण्यात येईल. अवयवदानाविषयी जनजागृती करून नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करण्याचे काम केले जाईल. या उपक्रमामुळे पुण्यातील रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अवयवदानाचे प्रमाणही वाढेल, असा विश्वास अमित बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल