तुम्ही योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर लहानशी चूक तुम्हाला मोठा खर्चात टाकू शकते. अशावेळी काही सावधगिरी बाळगून तुम्ही कार उन्हाळ्यात सुरक्षित ठेवू शकता. यासाठी आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.
कारच्या AC कडे लक्ष ठेवा
उन्हाळ्यात कारची एसी किती महत्त्वाची असते, हे सर्वांनाच माहिती आहे. तुमच्या कारचा एसी कूलिंग नीट करत नसेल तर आधी सर्व्हिस करणं गरजेचं ठरतं. यामुळे ड्रायव्हिंग आरामदायक राहील आणि सिस्टमवर जास्त प्रेशर येणार नाही.
advertisement
क्लच-गियरचं टेन्शनच नाही! या आहेत 5 स्वस्त ऑटोमेटिक कार, किंमत 6.2 लाखांपासून सुरू
इंजिन आणि कूलेंटकडे लक्ष कसं ठेवावं?
उन्हाळ्यामध्ये इंजिन हे खुप लवकरच गमर होतं. यामुळे कूलेंटचा योग्य लेव्हल असणे खुप गरजेचे अते. जर कूलेंट कमी असेल तर इंजिन ओव्हरहीट होऊ शकते आणि गाडीच्या इंजनमध्ये मोठी खराब येऊ शकते. ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशावेळी या गोष्टी लक्षात ठेवणं खुप गरजेचं असतं.
बॅटरी आणि दुसऱ्या गोष्टीं वेळो-वेळी चेक करा
उन्हाळ्यात बॅटरी लवकर खराब होऊ शकते. कारण जास्त तापमानामुळे याचं फ्यूल कमी होतं. यासोबतच इंजिन ऑइल, वायपर आणि फिल्टरही वेळोवेळी चेक करत राहा. जेणेकरुन अचानक कोणताही प्रॉब्लम येणार नाही.
बर्फासारखी गार होईल Car! कुलिंग होत नसेल तर फक्त करा एवढंच काम, 99 टक्के लोक करता ही चूक!
कार नेहमी सावलीत पार्क करा
कार पार्क करताना ती नेहमी सावलीत करा. जास्त वेळ उन्हात उभी राहिल्याने कारचं इंटीरियर खुप गरम होतं आणि पेंटही खराब होऊ शकतो. अशावेळी गाडीला सावली मिळाली नाही तर सनशेडचा वापर करा. सेफ्टी लक्षात घेता तुम्ही खिडकी थोडी ओपन साडू शकता.
