TRENDING:

जुनी कार विकताना अवश्य लक्षात ठेवा या गोष्टी! नंतर होणार नाही प्रॉब्लम

Last Updated:

जुनी गाडी विकताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. गाडी विकणे ही फक्त चावी बदलण्याची प्रक्रिया नाही, तर ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणून, जर तुम्हाला कोणत्याही अडचणी टाळायच्या असतील, तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोमवारी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या गाडीची अनेक वेळा खरेदी-विक्री झाली होती. तिच्या शेवटच्या मालकाचा शोध सुरू आहे. आरटीओ खरेदीदार आणि विक्रेते दोघांचेही रेकॉर्ड ठेवते. म्हणून, नवीन खरेदीदाराने गाडीचा गैरवापर केल्यास कोणतीही समस्या टाळण्यासाठी जुनी गाडी विकताना काही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
ओल्ट कार सेलिंग टिप्स
ओल्ट कार सेलिंग टिप्स
advertisement

गाडी विकणे म्हणजे फक्त पैसे आणि चावी बदलण्याबद्दल नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे जी गाडीची मालकी आणि जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करते. हे ट्रान्सफर पूर्ण झाले नाही किंवा योग्यरित्या केले गेले नाही, तर मागील मालकाला वाहतूक दंड किंवा वाहनाशी संबंधित फौजदारी आरोपांसाठी जबाबदार धरले जाऊ शकते.

40,000 KM की 5 वर्षे? कधी बदलायला हवे गाडीचे टायर, अवश्य घ्या जाणून

advertisement

लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे

1. सर्व कागदपत्रे पूर्ण करा

केवळ तोंडी करारावर अवलंबून राहू नका. विक्रीच्या वेळी, दोन्ही पक्षांना फॉर्म 29 आणि Form 30 सह सर्व आवश्यक फॉर्म भरून स्वाक्षरी करण्यास सांगा.

2. खरेदीदाराची ओळख पटवा

खरेदीदाराच्या सरकारी ओळखपत्राची (जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) आणि पत्त्याचा पुरावा नेहमीच घ्या.

advertisement

3. हस्तांतरणाचा पुरावा ठेवा

खरेदीदाराने विशिष्ट तारखेला आणि वेळेत वाहन आणि सर्व संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सांगणारी डिलिव्हरी पावतीवर स्वाक्षरी करण्यास सांगा.

4. ट्रान्सफर प्रोसेस ट्रॅक करा

वाहन विकल्यानंतर तुमची जबाबदारी संपत नाही. खरेदीदाराने आरटीओमध्ये वाहन ट्रान्सफर प्रोसेस सुरू केली आहे का ते तपासा आणि ती पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी फॉलो-अप घ्या.

advertisement

डिझेल कार पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या या मागचं खरं विज्ञान

5. विमा कंपनीला कळवा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
100 वर्षांची परंपरा, 30 प्रकारचे मिळतात पदार्थ, पुण्यातील बेकरी माहितीये का?
सर्व पहा

तुमच्या विमा कंपनीला वाहनाच्या विक्रीबद्दल कळवा जेणेकरून ते पॉलिसी रद्द करू शकतील किंवा No Claim Bonus ट्रान्सफर करू शकतील.

मराठी बातम्या/ऑटो/
जुनी कार विकताना अवश्य लक्षात ठेवा या गोष्टी! नंतर होणार नाही प्रॉब्लम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल