सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंडमधील नागेश आर्चिड स्कूल शेजारी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ आले आहेत. तर या फेस्टिवलमध्ये अनोखा इग्वाना सरडा पाहण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी पाहायला मिळत आहे. फूड फेस्टिवलमध्ये आलेला इग्वाना सरडा हा सात महिन्याचा आहे. दररोज या सरड्याला खाण्यासाठी ग्रीन व्हेजिटेबल्स दिले जातात. तर हा मेक्सिकन ब्रीड आहे. शाळेतील लहान मुलांना या इग्वाना सरड्या संदर्भात अधिक माहिती व्हावी म्हणून या फूड फेस्टिवलमध्ये हा सरडा पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे.
advertisement
तर या इग्वाना सरड्याचे डोके टोकदार आणि त्याचे शरीर दोन्ही बाजूंनी सपाट असून त्याचे पाय लांब, शेपटी बारीक पण लांबच लांब आहे. सरड्याच्या प्रजातीमध्ये काही प्रजातींमध्ये त्याचा रंग हिरवा, लाल, गुलाबी, तपकिरी रंगाचा इग्वाना सरडा आहे. तसेच या प्रजातीला ऊन जास्त प्रमाणावर लागतो. ज्या प्रकारे काहीजण पाळीव प्राणी पाळणारे असतात त्याचप्रमाणे काहीजण हा इग्वाना सरडा देखील घरामध्ये पाळला जातो. तसेच यांचा स्वभाव शांत असतो. वेळच्या वेळी जेवण आणि आरोग्याची काळजी घेतली तर जवळपास दहा ते अठरा वर्षांपर्यंत जगतात.





