Success Story : नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय, उच्चशिक्षित तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच

Last Updated:

ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पिके न घेता रेशीम शेतीकडे वळताना दिसत आहे. टेक्स्टाईल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलेले चंद्रकांत शेवाळे हे गेल्या दोन वर्षांपासून रेशीमची शेती करत आहेत.

+
News18

News18

सोलापूर : ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पिके न घेता रेशीम शेतीकडे वळताना दिसत आहे. टेक्स्टाईल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलेले चंद्रकांत शेवाळे हे गेल्या दोन वर्षांपासून रेशीमची शेती करत आहेत. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने चंद्रकांत यांनी रेशीम शेती करायचा निर्णय घेतला. आज या रेशीमच्या शेतीतून खर्च वजा करून दोन वर्षांत तीन लाखांचे उत्पन्न घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती चंद्रकांत शेवाळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात राहणारे चंद्रकांत शेवाळे हे गेल्या दोन वर्षांपासून रेशीमची शेती करत आहेत. रेशीमची शेती करत असताना सुरुवातीच्या सहा ते आठ दिवस अळ्यांना पाला कमी लागतो. जसजसे रेशीमच्या अळीचे साईज वाढत असते तसतसे अळ्यांना तुतीचा पाला जास्त टाकावा लागतो. एका एकरात जवळपास 200 ते 300 अंड्यांची रेशीमची बॅच घेतली जाते.
advertisement
उत्तम प्रकारच्या रेशीम अंडपुंजामधून तयार करण्याचे आणि त्यातून शंभर अंडकोष तयार झाले तर त्यातून 200 किलो कोश निघतो. सध्या रेशीम अंडकोशाला बाजारात 700 ते 800 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. सरासरी सातशे रुपये किलो जरी भाव मिळाला तर सर्व खर्च वजा करून जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न या रेशीम शेतीतून मिळते.
advertisement
चंद्रकांत यांनी रेशीमच्या अळ्यांना लागणारा तुतीचा पाला बाहेरून न आणता चार एकरमध्ये तुतीची लागवड केली आहे. रेशीमच्या अळ्यांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करावे लागते. रेशीमची शेती करत असताना रेशीमच्या अळ्यांना लागणारे तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ नये याची काळजी घेतली जाते. थंडी जर वाढली तर रेशीमच्या अळ्यांवर कागद टाकला जातो. त्यामुळे त्याच थंडीपासून अळ्यांचा बचाव होतो. तरुणांनी लाज सोडून शेती किंवा स्वतःच्या व्यवसायावर प्रामाणिकपणाने काम केले तर नक्कीच यश मिळेल, असा सल्ला उच्चशिक्षित चंद्रकांत शेवाळे यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय, उच्चशिक्षित तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement