Success Story : शेतकऱ्यानं धाडसं दाखवलं, सव्वा एकरमध्ये केली घेवडा शेती, वर्षाला 3 लाख कमाई
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
घोटकर यांनी सव्वा एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने घेवड्याची लागवड केली. योग्य बियाणे, वेळेवर खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन यामुळे त्यांच्या पिकाला चांगली वाढ मिळाली.
सात एकर शेती असूनही केवळ सव्वा एकर क्षेत्रात घेवडा अर्थात राजमा लागवड करून बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील शेतकरी महादू घोटकर यांनी लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. कमी जमिनीतून जास्त नफा मिळवता येतो का, या प्रश्नाला त्यांनी आपल्या प्रयोगातून ठोस उत्तर दिले आहे. मागील वर्षापासून सुरू केलेल्या या शेती प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
घेवडा हे पीक शेतकऱ्यांना फारसे फायदेशीर ठरत नाही, अशी सर्वसाधारण समजूत होती. उत्पादन खर्च, बाजारातील दरातील चढ-उतार आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे अनेक शेतकरी या पिकापासून दूर राहायचे. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करत घोटकर यांनी सव्वा एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने घेवड्याची लागवड केली. योग्य बियाणे, वेळेवर खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन यामुळे त्यांच्या पिकाला चांगली वाढ मिळाली.
advertisement
घोटकर यांची शेती पद्धत पारंपरिक नसून प्रयोगशील आहे. ते एका सीजनमध्ये दोन वेळा घेवड्याची लागवड करतात. पहिल्या पिकातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे दुसऱ्या पिकात सुधारणा करत त्यांनी उत्पादनात वाढ साधली. सात एकर शेती असतानाही केवळ सव्वा एकर क्षेत्रात त्यांनी हा प्रयोग करण्यामागचा उद्देश म्हणजे कमी जमिनीतूनही आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येते, हे दाखवून देणे हा होता.
advertisement
advertisement










