New Tiago
तुम्हाला टाटा मोटर्सची एंट्री-लेव्हल ऑटोमेटिक कार घ्यायची असेल तर टियागो कार एक बेस्ट ऑप्शन ठरतो. या कारची खासियत म्हणजे यात पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीसह 5-स्पीड एएमटी गियरबॉक्स दिलेय. ही अजुनही आकर्षक दिसते आणि यात तुम्हाला सर्व आवश्यक फीचर्स मिळतात. ज्यामध्ये 7-इंज टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, 4-स्पीकर साउंड सिस्टम, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि समोर दोन एयरबॅगचा समावेश आहे. या कारची किंमत 6.31 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
advertisement
2026 Volkswagen Taigun Facelift ची पहिली झलक आली समोर! पाहा कधी होतेय लॉन्च
S-Presso
ही भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कारमधून एक आहे. गाडीवर जीएसटी दर कमी झाल्यानंतर आता एस-प्रेसो भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार बनली आहे. या कारची साइज लहान आहे. मात्र तरीही यात 4 लोक बसण्यासाठी चांगला स्पेस मिळतो. एस-प्रोसो गाडीत 68 पीएस 1-लिटर पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड एएमटी गियरबॉक्स दिलंय. या कारचं व्हेरिएंट वीएक्सयआय (ओ) एजीएस आहे. ज्याची किंमत 4.75 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
Maruti Suzuki Wagon R
या कारमध्ये व्हीएक्सआय व्हेरिएंटमध्येऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन मिळतो. चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही 1-लिटर आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन दोन्हीसह एएमटीचं ऑप्शन निवडू शकता. वॅगनआरच्या डिझाइनमध्ये पुरेसे हेडरूम स्पेस मिळतं. ज्यामुळे कारमध्ये एंट्री करणं आणि बाहेर पडणं सोपं होतं. यासोबतच रोज शहरात येण्या-जाण्यासाठी हा भारी ऑप्शन ठरतो. या कारची किंमत 5.97 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे. यात 5-स्पीड एएमटीचं गियरबॉक्स मिळतं. हे व्हेरिएंट व्हीएक्सआय एजीएस आहे.
28 किमी मायलेज, टँकसारखी मजबूत अशी Maruti ची SUV, मार्केटमध्ये घातला धुमाकूळ
Swift
स्विफ्ट ही भारतातील सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक आहे. जी आपल्या मजेदार ड्रायव्हिंग एक्सपीरियन्ससाठी ओळखली जाते. यात व्हीएक्सआय व्हेरिएंटमध्ये नवीन 1.2 -लिटर पेट्रोल इंजिनसह ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिलाय. हे इंजिन 82 पीएसची पॉवर आणि 111 एनएमचं टॉर्क जनरेट करते. स्विफ्ट गाडीच्या फीचर लिस्टमध्ये एक 9-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, मल्टी-इंफो डिस्प्लेसह एनालॉग डायल्स, पुश बटण स्टार्टसह कीलेस एंट्री, पॉवर विंडो आणि क्रूझ कंट्रोलचा समावेश आहे. या कारची किंमत 7.04 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
Exter
नुकतीच लॉन्च करण्यात आलेली एक्सटर आता पहिल्यापेक्षा जास्त आकर्षक आणि दमदार अंदाजात समोर आलीये. याच्या HX3 AMT सह अनेक व्हेरिएंट्समध्ये ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन मिळतो. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 6.9 लाख रुपये आहे.
या कारमध्ये 1.2 लिटरचं 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. जे 83hp टी पॉवर आणि 114Nm चा टार्क जनरेट करते. यासह कंपनी यात सीएनजी ऑप्शनही ऑफर करतेय. अपडेटेड एक्सटरमध्ये डिझाइन आणि फीचर्सच्या स्तरावर मोठे बदल करण्यात आलेय. यात नवीन फ्रंट डिझाइन, 15-इंचाचे डायमंड-कट अलॉय व्हील्स आणि फ्रेश नेव्ही-ग्रे इंडीरियर थीम आहेत. ज्यामुळे ही कार प्रीमियम फील देते.
