TRENDING:

रोडवर काढलेल्या पांढऱ्या रेषांचा अर्थ काय? 90% लोकांना माहितीच नाही

Last Updated:

रस्त्यांवर दिसणाऱ्या पांढऱ्या रेषा या फक्त पेंट नसतात. तर तुमचा जीव वाचवण्याच्या नियमांचा तो संकेत असतो. पण अनेकांना रस्त्यांच्या या रेषांचा अर्थच माहिती नसतो. आज आपण याविषयीच जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रस्त्यांवर गाडी चालवताना आपण सिग्नल, स्पीड आणि ट्रॅफिकवर लक्ष देतो. मात्र अनेकदा रस्त्यांवरील रेषांवर दुर्लक्ष करतो. विशेषतः पांढऱ्या रंगांच्या रेषांवर दुर्लक्ष करतो. ज्या आपल्याला रस्त्यांवर काढलेल्या दिसतात. हा रेषा फक्त पेंट नसतात. तर रस्त्यांवर सुरक्षित आणि नियमांअंतर्गत चालवण्याचा पूर्ण संकेत देतात. तुम्हालाही या पांढऱ्या रेषांचा योग्य अर्थ माहिती नसेल तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
रस्त्यांवरच्या पांढऱ्या रेषांचा अर्थ काय?
रस्त्यांवरच्या पांढऱ्या रेषांचा अर्थ काय?
advertisement

पांढऱ्या रेषांचा खरं काम काय?

रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या रेषा ट्रॅफिक व्यवस्थित करण्यासाठी बनवल्या जातात. याचा मुख्य काम लेन वेगळी करणे आणि वाहनांची दिशा ठरवणे असते. जिथे एकाच दिशेने अनेक लेन असतात, तिथे हे पट्टे चालकांना त्यांच्या लेनमध्ये राहण्याचे संकेत देतात, ज्यामुळे वाहतूक सुरळीत राहते.

गडद पांढऱ्या लाइनचा अर्थ 

तुम्हाला रस्त्यावर सरळ, अखंड पांढरी रेषा दिसली तर याचा अर्थ असा की तुम्ही लेन बदलू नये. ही रेषा ओलांडणे वाहतूक नियमांचे उल्लंघन मानले जाते आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो.

advertisement

तुटक पांढऱ्या रेषेचा अर्थ काय

तुटक किंवा डॅशच्या पांढऱ्या लाइनचा अर्थ तुम्ही गरज पडल्यावर सावधगिरीने लेन बदलू शकतात. जसं हायवेवर ओव्हरटेक करताना इंडिकेटर देऊन आणि आजुबाजूला पाहत लेन बदलली जाऊ शकते.

28 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी अन् किंमतही कमी! कमी पगार असेल तरी घरी येईल SUV, 5 बेस्ट मॉडेल!

advertisement

स्टॉप लाइन आणि झेब्रा क्रॉसिंगचा संकेत 

ट्रॅफिक सिग्नलवर तयार केलेली जाड पांढरी लाइनला स्टॉप लाइन म्हटले जाते. लाल लाइट लागल्यावर वाहनाला याच लाइनवर रोखणे गरजेचे आहे. तसंच पायी प्रवाशांसाठी तयार केलेली झेब्रा क्रॉसिंगही पांढऱ्या पट्ट्यांनी चिन्हित असते. ज्यामुळे ते सुरक्षित पद्धतीने रस्ते पार करु शकतील.

रात्रीची देते सुरक्षा

अनेक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांमध्ये रिफ्लेक्टिव्ह पेंट किंवा कॅट-आय लावले जातता. हे रात्रीच्या वेळी हेडलाइटच्या प्रकाशात चमकतात. ज्यामुळे ड्रायव्हरला लेन स्वच्छ दिसते आणि अंधारातही वाहन योग्य दिशेत चालत राहते.

advertisement

Maruti Fronx किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? पाहा कॅलक्युलेशन

या निशाण्या समजून घेणे का गरजेचे 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

वाहनचालकांनी या पांढऱ्या पट्ट्यांचा अर्थ समजून घेतला आणि त्यांचे पालन केले तर वाहतूक कोंडी आणि अपघात लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. रस्त्यावरील प्रत्येक ओळ ही केवळ एक खुणा नाही तर तुमच्या सुरक्षिततेशी संबंधित एक महत्त्वाचा नियम आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
रोडवर काढलेल्या पांढऱ्या रेषांचा अर्थ काय? 90% लोकांना माहितीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल