TRENDING:

मेहनतीच्या जोरावर टेम्पोचालकाची मुलगी झाली न्यायाधीश; अशी आहे गुलफाम सय्यदची कहाणी

Last Updated:

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करिअरमध्ये मोठं यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा इतर तरुणांसाठी प्रेरणादायी असतात. गुलफाम सय्यदची कहाणी अशीच काहीशी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 16 ऑक्टोबर :  प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करिअरमध्ये मोठं यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा इतर तरुणांसाठी प्रेरणादायी असतात. आज अनेक तरुण-तरुणी कठोर मेहनत, जिद्दीच्या जोरावर यूपीएससी, एमपीएससी, पोलीस, सैन्य भरती परीक्षांमध्ये यश मिळवताना दिसतात. गुलफाम सय्यदची कहाणी अशीच काहीशी आहे. आम्ही एका खोलीत राहतो. या खोलीतच जेवतो, वावरतो. मी या खोलीतच अभ्यास केला. घरातले अन्य सदस्य आसपास असतानाही मी अभ्यासवर लक्ष केंद्रित केलं, असे गुलफामने सांगितले. पंजाब नागरी सेवा न्यायिक परीक्षा उत्तीर्ण होऊन ती आता न्यायाधीश बनली आहे. गुलफामचे वडील तालिब हुसेन हे टेम्पोचालक आहेत.
 गुलफाम सय्यद
गुलफाम सय्यद
advertisement

प्रत्येक व्यवसायात अनेक यशस्वी व्यक्ती असतात. पण जगभरात काही मोजक्या व्यक्तींच्या यशोगाथा लिहिल्या जातात. कारण त्यांचा प्रवास इतरांपेक्षा दीर्घ आणि कठीण असतो. यशाच्या मार्गावर उभी असलेली सर्व माणसं तिथं पोहोचल्यावर एकाच पातळीवर असतात, पण ज्यांचा प्रवास वेगळा असतो, त्यांच्या कथा लिहिल्या जातात. पंजाबमधल्या मालेरकोटला येथील रहिवासी गुलफाम सय्यदची कथा अशीच वेगळी आहे. पंजाब नागरी सेवा न्यायिक परीक्षा उत्तीर्ण होऊन ती न्यायाधीश बनली आहे.

advertisement

रिक्षा चालकाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात नौसेनेत; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलं यश

गुलफामचे वडील तालिब हुसेन हे व्यवसायाने टेम्पोचालक आहेत.

गुलफामने लहानपणापासून आपल्या कुटुंबात आर्थिक संकट पाहिले. तिने मालेरकोटला शहरातल्या इस्लामिया गर्ल्स सीनिअर सेकंडरी स्कूलमधून इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. यानंतर मालेरकोटला येथील इस्लामिया गर्ल्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पदवीनंतर तिने पटियाळातील पंजाब विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतलं.

advertisement

आपल्या समस्या प्रसारमाध्यमांसोबत शेअर करताना गुलफामने सांगितलं की, पटियाळा येथे पेपर देण्याकरिता जाण्यासाठी 150 रुपये लागायचे. पण ही छोटी रक्कमही गोळा करणं माझ्या वडिलांसाठी मोठी गोष्ट होती. पेपर देण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या खिशात 150 रुपये देखील नव्हते. असं अनेक वेळा घडलं. वडील मला पैसे द्यायचे पण नंतर त्यांचं पाकिट अनेकदा रिकामंच राहायचं. ते नेहमी म्हणायचे, हरकत नाही, तू हे पैसे घे आणि मनापासून अभ्यास कर. यशस्वी हो. आम्ही स्वतःची व्यवस्था करू.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

कुटुंबीय आणि वडिलांनी आपल्या क्षमतेच्या पलीकडे जात गुलफामला शिकवलं आणि ती यशस्वी झाली. सर्वांच्या मेहनतीचा आदर केला. त्याचे फळ ही तिला मिळाले. घराची आर्थिक परिस्थिती सांगताना गुलफाम म्हणते की, आमचे घर एक खोलीचे आहे. या छोट्या घरात आम्ही सगळे राहतो. इथेच खातो आणि वावरतो. मी या खोलीत अभ्यास केला. पण मी शिकावे या उद्देशाने घरच्यांनी कायम शांतता राखली. मी खोलीत अभ्यास करत असताना कोणीही मला बोलले नाही किंवा त्रास दिला नाही.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
मेहनतीच्या जोरावर टेम्पोचालकाची मुलगी झाली न्यायाधीश; अशी आहे गुलफाम सय्यदची कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल