रिक्षा चालकाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात नौसेनेत; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलं यश Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही गायत्री ठोंबरे पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौसेनेत भरती झाली आहे.
जालना, 16 ऑक्टोबर : आपल्या आजूबाजूला अनेक प्रेरक घटना घडत असतात. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अनेक तरुण तरुणी यशाची नवनवी शिखरे पार करत असतात. अशीच प्रेरक कहाणी आहे जालना शहरात शंकरनगर इथे राहणाऱ्या गायत्री ठोंबरे हीची आहे. वडील रिक्षा चालवितात, आई एका खासगी संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही गायत्रीने पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौसेनेत भरती झाली आहे.
कसा झाला प्रवास?
गायत्री ज्ञानेश्वर ठोंबरे हीच दहावीपर्यंतचे शिक्षण नूतन विद्यालय जुना जालना येथे झालं तर बारावीपर्यंतचे शिक्षण देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झालं. त्यानंतर तिची भारतीय नौसेनेत निवड झाली आहे. गायत्री आता गुजरातच्या बॉर्डरुन जहाजात थांबून सेनेसोबत भारताचे संरक्षण करणार आहे. गायत्रीचे चार महिने ओडिशा येथे प्रशिक्षण झाले. पाण्याव्दारे दहशतवादी हल्ला झाल्यास, मिसाईलने हल्ला झाल्यास पाणबुडी, रायफलने तो हल्ला कसा रोखावा, याचे विशाखापट्टणम येथील पाण्यातील जहाजावर पुढचे प्रशिक्षण आता होणार आहे.
advertisement
कुटुंबासह नातेवाइकांची मदत
आमच्या घराची परिस्थिती अतिशय साधारण असताना देखील माझ्या आई-वडिलांनी मला सातत्याने पाठिंबा दिला. नुकतेच चार महिन्यांचे प्रशिक्षण ओडिशा इथे पार पडले. आता 15 दिवस विशाखापट्टणम येथे जहाजावर प्रशिक्षण होणार आहे. येथील प्रशिक्षण झाल्यानंतर आता गुजरात येथे नेमणूक होत आहे. या यशासाठी कुटुंबासह नातेवाइकांची मदत झाली असल्याचे गायत्री ठोंबरे हिने सांगितले.
advertisement
गायत्रीने इच्छा पूर्ण करून दाखवली
आमची मुलगी गायत्री ठोंबरे ही नुकतीच भारतीय नौदलात दाखल झाली आमची परिस्थिती तशी खूप खराब होती. मी तब्बल दहा वर्षे लोकांची भांडे घासली त्यानंतर सध्या शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. परिस्थिती नाजूक असताना देखील मी हार न मानता सगळ्या लेकरांना शिकवलं. एकातरी लेकराने वर्दी घालावी अशी माझी इच्छा होती. ती इच्छा गायत्रीने पूर्ण करून दाखवली, असं गायत्रीच्या आईने सांगितले.
advertisement
झोपडीतील लेखक सातासमुद्रापार; मराठमोळ्या साहित्यिकाचा जगभर डंका
गायत्रीने प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेऊन भारतीय नौदलात ती दाखल झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे गायत्रीचे वडील रावसाहेब ठोंबरे यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
October 16, 2023 7:23 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
रिक्षा चालकाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात नौसेनेत; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलं यश Video