India-pak: भारत-पाकिस्तान मॅच आधी एक वाईट बातमी! सलामीवीर फलंदाजाला दुखापत, मैदानातून थेट बाहेर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
India-pak: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा सहावा सामना रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होईल.
नवी दिल्ली : टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी स्टार फलंदाज शुभमन गिलच्या हाताला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा सहावा सामना रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होईल.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गिलला भारताच्या सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दुखापतीनंतर गिलला त्रास होत होता. संघाचे फिजिओ ताबडतोब त्याच्या मदतीला धावले. यानंतर, गिल मैदानाबाहेर गेला आणि दुखापत झालेला हात धरून बर्फाच्या बॉक्सवर बसल्याचे दिसून आले.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दोघांनी त्या घटनेनंतर गिलशी बराच वेळ चर्चा केली. गिलचा सलामीवीर जोडीदार अभिषेक शर्माने त्याला पाण्याची बाटली उघडण्यास मदत केली, शिवाय फिजिओ त्याची चांगली काळजी घेताना दिसून आला. तथापि, काही मिनिटांनंतर, गिल पुन्हा नेट्सवर परतला आणि पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्याचेही दिसून आले.
advertisement
समजा जर गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही, तर संजू सॅमसन त्याच्या जागी सलामीवीर फलंदाज म्हणून खेळेल. सॅमसन हा टी-20 मध्ये भारताचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. केरळच्या या क्रिकेटपटूने गेल्या वर्षी टी-20 मध्ये सलामीवीर म्हणून तीन शतके झळकावली होती. बुधवार, 10 सप्टेंबर रोजी युएई विरुद्धच्या सामन्यात संजू भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण, फक्त 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
advertisement
अर्शदीप सिंग हा भारताचा टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 63 सामन्यांमध्ये 99 फलंदाजांना बाद केले आहे. तरीही, युएई विरुद्धच्या सामन्यात त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू शिवम दुबेने दोन षटकांत चार धावा देत तीन बळी घेतले, तर कुलदीप यादवने 2.1 षटकांत सात धावा देत चार विरोधी फलंदाजांना बाद केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 11:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India-pak: भारत-पाकिस्तान मॅच आधी एक वाईट बातमी! सलामीवीर फलंदाजाला दुखापत, मैदानातून थेट बाहेर