नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI मुळे महिला प्रेग्नंट, पण कसं काय?

Last Updated:

आता तुम्ही विचार कराल की प्रेग्नंट होण्यासाठी नवरा-बायकोमध्ये शरीरिक संबंध गरजेचं आहे. तसेच जिथे IVF नं काही होत नव्हतं त्यात AI नं असं काय केलं असेल? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे केवळ तंत्रज्ञानापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. शिक्षण, बिझनेस, मनोरंजन आणि आता वैद्यकीय क्षेत्रातही AI मोठे बदल घडवत आहे. अनेक जटिल आजारांच्या निदानापासून ते शस्त्रक्रियेतल्या अचूकतेपर्यंत AI डॉक्टरांसाठी एक महत्त्वाचं हत्यार बनलं आहे. पण आता तर AI ने अशा गोष्टीत यश मिळवलं आहे, ज्याला खऱ्या अर्थाने ‘जीवन देणं’ असं म्हणता येईल.
19 वर्षांची अपूर्ण प्रतीक्षा
एका कपलच्य लग्नाला तब्बल 19 वर्षं होऊनही त्यांना मूल होत नव्हतं. नवऱ्याला अ‍ॅझोस्पर्मिया नावाची समस्या असल्यामुळे त्याच्या वीर्यात शुक्राणू सापडत नव्हते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये सामान्य तपासणीत शुक्राणू शोधता येतच नाहीत. त्यामुळे 15 वेळा IVF करूनही हे जोडपं वारंवार अपयशी ठरत होतं.
याच टप्प्यावर कोलंबिया विद्यापीठातील तज्ज्ञांनी AI आधारित ‘STAR’ (Sperm Tracking and Recovery) तंत्रज्ञानाचा वापर केला. हे मशीन फक्त एका तासात तब्बल 80 लाख प्रतिमा तयार करतं आणि त्यातून अतिशय सूक्ष्म आणि लपलेले शुक्राणू शोधून काढतं. मानवी डोळ्यांना जे दिसत नाही, ते AI सहज ओळखतं.
advertisement
शोधलेले हे शुक्राणू मग विशेष प्रक्रियेद्वारे वेगळे करून IVF मध्ये वापरले गेले. यशस्वी प्रयोगांनंतर अखेर त्या महिलेला गर्भधारणा झाली. या संशोधनासाठी डॉक्टरांनी जवळपास 5 वर्षं मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम म्हणजे एका जोडप्याचं 19 वर्षांचं अपूर्ण स्वप्न अखेर साकार झालं आणि हे शक्य झालं फक्त AI मुळे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI मुळे महिला प्रेग्नंट, पण कसं काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement