BMC Election: युतीचं घोडं कुठं अडलं? 'राज की बात', ठाकरे गटासमोर मनसेची एक अट, नंतरच घोषणा?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election : उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेची प्रतिक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. मात्र, पडद्यामागे मोठी घडामोड घडत आहेत.
मुंबई: मागील काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेची प्रतिक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. मात्र, पडद्यामागे मोठी घडामोड घडत आहेत. ठाकरे बंधूंची युती निश्चित समजली असली तरी जागा वाटप कळीचा मुद्दा ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
युतीची घोषणा कुठं अडली?
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात मागील काही दिवसांपासून जागा वाटपांबाबत चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपात मराठी भाषिक बहुल भागातील जागांचा तिढा असल्याची चर्चा आहे. जागा वाटपात काही जागांवरून दोन्ही पक्षात तणातणी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. मागीलक दोन-चार दिवसात ठाकरे गट आणि मनसे नेत्यांमध्ये चर्चांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे युतीच्या हालचालींना वेग आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
मनं जुळली पण युतीची घोषणा का नाही?
उद्धव आणि राज ठाकरे हे कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र आले आहेत. राजकीय मंचावरही एकत्र दिसले आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून युतीच्या घोषणेवर अद्याप शिक्कामोर्तब केले जात नसल्याचे म्हटले जात आहे. जागा वाटपांचा तिढा सुटल्याशिवाय युतीची घोषणा नाही, असे मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी म्हटले. युतीची घोषणा झाल्यास आणि जागा वाटपावरुन बिनसल्यास मनसेला त्याचा फटका बसण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. जागा वाटपाआधीच युतीची घोषणा टाळली जात असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकी आधी आलेल्या निकालांनी ठाकरे बंधूंना रेड अलर्ट दिला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याआधीच राजकीय गणितांच्या जुळवाजुळवीला मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ नगर परिषदेत उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आले. मात्र, राजकीय अवकाशाच्या शोधात असलेल्या ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे. ठाकरे गटाला भोपळाही फोडता आला नाही. तर, दुसरीकडे स्वतंत्र लढणाऱ्या काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai
First Published :
Dec 22, 2025 11:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: युतीचं घोडं कुठं अडलं? 'राज की बात', ठाकरे गटासमोर मनसेची एक अट, नंतरच घोषणा?









