समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये राहणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेने लग्नासाठी आपले नाव एका विवाह संकेतस्थळावर नोंदवले होते. या संकेतस्थळावर आरोपी कल्पेश कक्कड यांची ओळख महिलेशी झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले त्यानंतर या दोघांनी साखरपुडा सुद्धा केला. यानंतर महिलेला घरी येऊन गुंगीचे औषध देऊन महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले.
12 लाखाची केली फसवणूक
advertisement
या सोबतच महिलेच्या भावाला शेअर मार्केट नफा मिळवून देतो असे आमिष दाखवत 12 लाखाची फसवणूक केली. या नंतर लग्नास नकार दिल्याने महिलेने पोलिसाता तक्रार दिली . या नंतर पोलिसांनी आपलीं कारवाई करत आरोपी कक्कड याला मुंबई येथून अटक केली आहे.. आरोपी कल्पेश कक्कड यांची पोलिसांनी चोकशी केली असता यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. त्याने या पद्धतीने अनेक महिलांनची फसवले असल्याचे समोर येते आहे. या प्रकरणाती पोलिस अधित चौकशी करत आहेत.
अमरावतीत देखील लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना मेळघाटातील चिखलदरा परिसरात घडली आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती झाली आहे. मेळघाटातील चिखलदरा पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. 20 वर्षीय राहुल जामुनकर या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमाचे नाटक करत लग्नाचे आमिष देऊन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहे.
अमरावतीच्या ग्रामीण भागात 51 अत्याचाराच्या घटना उघडकीस
दरम्यान अमरावतीच्या ग्रामीण भागात 51 अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत.यातील 40 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत. 8 ते 10 प्रकरणात अल्पवयीन पीडिता गर्भवती असल्याचे देखील समोर आले आहे. मागील वर्षी ही संख्या 35 वर होती..
