30 वर्षीय महिलेचा तिच्या सासरकडील लोकांवर आरोप आहे की तिचा पती घटस्फोटासाठी दबाव आणत होता. नकार दिल्यास तुझे खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी त्या महिलेच्या पतीने महिलेला दिली होती. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, भिवंडीतील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने सांगितले की, तिचा पती कलाम हुसेन मोहम्मद सय्यद, तिचे सासू, सासरे आणि नणंद यांनी तिला तिच्या आई- वडीलांच्या घरातून सोने- चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आणण्यास भाग पाडले.
advertisement
तिने त्यासाठी नकार दिला असता त्यांनी तिचा मानसिक आणि आर्थिक छळ केला. पीडित महिलेने असेही सांगितले की, उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या मौईम जिल्ह्यातील राजवापूर गावात आम्ही राहत असताना तिथे माझा पती बेडरूममधील व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. मला अनेकदा त्याने माझे खासगी फोटो आणि व्हिडिओ दाखवून तो माझ्यावर घटस्फोटासाठी दबाव आणायचा. 3 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केले आणि ते सर्व फोटो आणि व्हिडिओ आमच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर गेले, ज्यामुळे ती घाबरली.
पीडितेच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी तिचा पती कलाम हुसेन मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 67- A अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा सध्या तपास सुरू असून आरोपी पतीचा आणि त्याच्या घरच्यांचा शोध घेतला जात आहे.
