आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रविवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
मुंबई: रविवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, केळी आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
आल्याच्या आवकेत चढ-उतार
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1034 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 1001 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 2750 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 29 क्विंटल आल्यास 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक दबावात
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 171 क्विंटल केळीची आवक राहिली. पुणे मार्केटमध्ये आवक केळीस प्रतीनुसार 1650 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक कमी
आज राज्याच्या मार्केटमध्ये 143 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 119 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2500 ते 17500 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 12 क्विंटल डाळिंबास 7500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 8:06 PM IST








