गोरखपूरच्या बेलघाट भागातील एक 'भूत' बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये आटोक्यात आलं. या प्रकारामुळे गेल्या आठ महिन्यांपासून एक कुटुंब अडचणीत आलं होतं. कुटुंबात विचित्र घटना घडत होत्या. रात्री स्वयंपाकघरातील भांडी तुटलेली आढळून यायची. घराच्या खिडक्यांच्या काचा फुटायच्या. घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे टायर पंक्चर व्हायचे. मध्यरात्री गच्चीतून आवाज येत असत. ही सर्व कामं कुटुंबातील मुलगीच करत होती.
advertisement
यादरम्यान मुलीची प्रकृतीही ढासळू लागली. ती काहीही बोलू लागली. संध्याकाळ जवळ आली की तिच्या वागण्यात बदल व्हायचा. कुटुंबाला असं वाटलं की तिला भूताने पछाडलं आहे. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी भूतबाधा काढण्यासाठी तिला मांत्रिकाकडे नेलं. त्यानंतर तीन महिन्यांपासून तिच्यावर बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. आता तिच्या आजाराची माहिती डॉक्टरांना मिळाली आहे.
पीडित मुलगी अल्पसंख्याक कुटुंबातील आहे. कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक भाऊही आहे. पीडित तरुणीचं एका नातेवाईक तरुणावर प्रेम होतं आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. तर मुलीच्या भावाचंही नात्यातीलच एका मुलीवर प्रेम जडलं. आश्चर्याची बाब म्हणजे घरच्यांनी मुलाचं नातं मान्य केलं आणि लग्नाची चर्चा सुरू झाली. मात्र कुटुंबीयांनी मुलीच्या प्रेमावर आक्षेप घेत त्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला.
या प्रकरणी बीआरडी मेडिकल कॉलेजचे असोसिएट प्राध्यापक डॉ.अमिल हयात खा यांनी सांगितलं की, कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर मुलीला गंभीर मानसिक आघात झाला आहे. ती डिसोसिएशनची बळी ठरली आहे. हा एक मानसिक आजार आहे. मन विचारांनी भरून जातं. अशा परिस्थितीत, रुग्णाला विचित्र गोष्टी करण्यात मजा येते. सध्या उपचारासोबतच मेडिकल कॉलेजमध्ये मुलीचे समुपदेशनही करण्यात येत आहे. त्यामुळे मुलीचे वर्तन सामान्य होत आहे.