TRENDING:

15 वर्षांचा संसार, बायकोवर संशय म्हणून नवऱ्यानं GPS ट्रॅकर लावला; पण जे दिसलं ते धक्कादायक

Last Updated:

GPS Tracker : बायको आणि मुलांसहीत सुखी आयुष्य जगत असताना, नवऱ्याला बायकोवर संशय आला आणि त्याने त्यानंतर असं काही पाऊल उचललं की ज्यानंतर त्याचा संशय सत्यात बदलला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात एक्ट्रा मॅरेटल प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. यामुळे दीर्घकाळ टिकून असलेल्या नात्यांमधील विश्वास आणि बांधिलकीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. पंजाबमधील अमृतसर येथे नुकतीच उघड झालेली एक घटना 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनातील कटू सत्य समोर आणणारी आहे.
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

बायको आणि मुलांसहीत सुखी आयुष्य जगत असताना, नवऱ्याला बायकोवर संशय आला आणि त्याने त्यानंतर असं काही पाऊल उचललं की ज्यानंतर त्याचा संशय सत्यात बदलला आणि त्याने आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत एका हॉटेलमध्ये पकडलं पकडलं. बायकोनं धोका दिल्यानंतर नवऱ्याची अवस्था खूपच वाईट झाली आणि तो आतून पूर्णपणे खचला गेला.

आता नक्की काय आणि कसं घडलं? चला सविस्तर जाणून घेऊ

advertisement

रवी गुलाटी (Ravi Gulati) आणि हिमानी यांचं लग्न 25 एप्रिल 2010 रोजी झाला होता. त्यांचे वैवाहिक जीवन तसे व्यवस्थित सुरू होते, पण 2018 मध्ये रवी यांना धक्का बसला. रवी यांच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्येही त्यांची पत्नी हिमानी एका हॉटेलमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत सापडली होती. पण त्यावेळी मुलांचा विचार करुन तो गप्प बसला, पण पुन्ही बायकोनं तिच चुक केली आणि यावेळी हे प्रकरण खूपच गंभीर झालं.

advertisement

रवी गुलाटी यांनी सांगितले की, "तेव्हा मी तिला ताकीद दिली आणि तिच्या आई-वडिलांना बोलावले. त्यांनी येऊन समजावले आणि माझ्या पत्नीने तसेच तिच्या आई-वडिलांनी माझी माफी मागितली. आमच्या कुटुंबात लहान मुले असल्याने आणि माणसाकडून चूक होऊ शकते, या विचाराने मी तिला माफ केले. पण, यावेळी परिस्थिती खूप गंभीर बनली आहे."

पत्नीच्या वागण्यामुळे रवी यांना मागील एक वर्षापासून संशय येत होता. त्यामुळे नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी रवी यांनी पत्नीच्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवर जीपीएस ट्रॅकर (GPS Tracker) लावला होता. रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी 3 ते 3:30 च्या दरम्यान हिमानी घरातून बाहेर पडली. रवी यांनी तिला 15 ते 20 वेळा फोन केला, पण तिने उचलला नाही. त्यावेळी संशय बळावल्यामुळे रवी यांनी लगेच स्कूटरच्या जीपीएस लोकेशन तपासले, दुकान बंद केले आणि त्या लोकेशनचा पाठलाग करत एका हॉटेलजवळ पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या बायकोला दुसऱ्या व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडले.

advertisement

रवी गुलाटी यांचे वडील परवेज गुलाटी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रकार मागील 5 ते7 वर्षांपासून सुरू आहे. पहिली घटना घडल्यानंतर आमदार महोदयांच्या घरी दोन्ही कुटुंबांची बैठक झाली होती आणि तेव्हा हिमानीने माफी मागितल्यावर कुटुंबाने तिला स्वीकारलं होतं.

परवेज गुलाटी यांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीसोबत हिमानी हॉटेलमध्ये सापडली, त्या व्यक्तीला हिमानीने कुटुंबीयांशी माझा भाऊ म्हणून ओळख करून दिली होती. तो व्यक्ती त्यांच्या घरी नियमित येत-जात असे.

advertisement

मला रवीसोबत राहायचं नाही

यावेळी हॉटेलमध्ये पकडल्यानंतर हिमानीने थेट कुटुंबाला सांगितले की, मला रवीसोबत राहायचे नाही. तिला तिच्या माहेरीपरत जायचे आहे. गुलाटी कुटुंबाने हिमानीच्या कुटुंबियांना वारंवार फोन करून चर्चा करण्यासाठी आणि विषय सोडवण्यासाठी बोलावले आहे, पण अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे परवेज गुलाटी यांनी सांगितले.

या घटनेवर बोलताना पत्रकार आणि चित्रपट निर्मात्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, आता ही महिला केवळ पतीवरच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबावर हुंडा, घरगुती हिंसाचार किंवा पोटगीसाठी खोटे गुन्हे दाखल करेल आणि पोलिसांकडून त्यांना त्वरित न्याय मिळेल, कारण तिला 'अबला नारी' मानले जाते आणि व्यभिचाराच्या एका घटनेमुळे तिची पोटगी मिळवण्याची शक्यता कमी होत नाही."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

या घटनेमुळे वैवाहिक जीवनातील विश्वास आणि कायद्याचे स्वरूप यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. लोक आता यावर आपलं मत व्यक्त करु लागले आहेत. ज्यामुळे हे प्रकरण आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
15 वर्षांचा संसार, बायकोवर संशय म्हणून नवऱ्यानं GPS ट्रॅकर लावला; पण जे दिसलं ते धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल