हिरामण धुर्वे असं आरोपी बापाचं नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील बहादा गावात आपल्या कुटुंबासमवेत राहातो. आरोपी धुर्वेला मागील अनेक वर्षांपासून दारुचं व्यसन आहे. त्याचा ३२ वर्षीय मुलगा हाही गेल्या काही काळापासून दारुच्या आहारी गेला आहे. बापलेकही दारुच्या आहारी गेले होते. यातूच धुर्वेनं आपल्या पोटच्या मुलाला संपवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी हिरामण धुर्वे याने स्वत:ला प्यायला दारू आणली होती. घरी आल्यानंतर त्याने एकेठिकाणी दारू ठेवली. ही बाब मुलाला समजल्यानंतर त्याने वडिलांच्या नकळत दारू ढोसली. दारु प्यायल्यानंतर मुलगा घरात झोपी गेली. दुसरीकडे, बापाने दारुची शोधाशोध सुरू केली. यावेळी आपण आणलेली दारू मुलगा प्यायला, अशी माहिती बापाला मिळाली.
advertisement
याबाबत आरोपी बापाने आपल्या मुलाला जाब विचारला. दारू पिण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर बापलेकांमध्ये हाणामारी झाली. या वादानंतर ३२ वर्षीय मुलगा घरात झोपी गेला. यावेळी संतापलेल्या पित्याने झोपलेल्या आपल्या मुलाच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार वार केला. हा वार वर्मी लागून मुलगा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. घोटभर दारुसाठी बापानेच मुलाची अशाप्रकारे हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
