नांदूर शिंगोटे येथे सेंट्रींगच्या कामावरील मजुराने आपल्याच सहकारी मजुराचा डोक्यात अवजड वस्तूने आघात करून खून केल्याची घटना घडली. भाजीमध्ये शॅम्पूचे पाणी का टाकले अशी विचारणा करणे दुर्देवी मजुराच्या थेट जीवावर उठले.
राजनकुमार सूरज साथ (35 रा. चौपारण, झारखंड) असे दुर्देवी मयत मजुराचे नाव आहे. तो नंदुर-शिंगोटे येथे सानप यांच्या मळ्यातील खोलीत अजय सुभाष गाडेकर (30 रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोक्त
advertisement
वास्तव्याला होता. सायंकाळी सुट्टी झाल्यावर दोघांनी जेवण बनवले. अजय गडेकरने भाजीमध्ये शाम्पूचे पाणी ओतले. याचा राग आल्याने राजन कुमारने त्याला विचारणा केली.
डोक्यात लोखंडी वस्तूने आघात करून खून
किरकोळ गोष्टीवरून सुरू झाल्यानंतर दोघांचे भांडण झाले. त्यानंतर रात्री दहाच्या गाडेकरने खोलीत झोपलेल्या राजन कुमार याच्या डोक्यात लोखंडी वस्तूने आघात करून त्याचा खून केला. त्याला अंथरुणामध्ये झोपवून गाडेकर खोलीबाहेर उभ्या पिकअपमध्ये जाऊन झोपला. मंगळवारी सकाळी सहा वाजता उठल्यावर त्याने सानप यांना माझ्या सहकाऱ्याचा कोणीतरी खून केल्याचे सांगितले.
गाडेकर हिस्ट्रीसीटर गुन्हेगार
संशयित अजय गाडेकर हा हिस्ट्रीसीटर गुन्हेगार आहे. 2023 मध्ये पैठण पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये तो दोन वर्षांची शिक्षा भोगून जामीनावर बाहेर आला.
सोलापुरात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
सोलापुरात पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. सोलापुरातील न्यू बुधवार पेठ येथील घटना, मंगळवारी सकाळी आठ वाजता घडली घटना घडली. यशोदा सुहास सिद्धगणेश असे मृत पावलेल्या पत्नीचे नाव तर सुहास तुकाराम सिद्धगणेश असे चाकूने सपासप वार केलेल्या पतीचे नाव आहे. यशोदा आणि सुहास गेल्या आठ महिन्यापासून राहत विभक्त राहत होते. मयत यशोदा आणि तिची मुलगी सौंदर्य ही एकत्र राहत होते. पती सुहास हा यशोदावर चारित्र्याचा संशय घेऊन होता, याच वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यशोदा ही कस्तुरबा मार्केट येथे कांदा विक्री करण्याचं काम करत होती. याप्रकरणी सुहास सिद्धगणेश यांच्या विरोधात जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.