गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील भटपर गावात ही घटना घडली आहे. या घटनेत मूळचे छत्तीसगडचे हालेवाडा येथील रहिवाशी असलेले टोका डोलू मज्जी यांचा मृतदेह गावाजवळील नाल्याच्या पाण्यात तरंगताना आढळला होता. विशेष म्हणजे त्यांच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे.त्यामुळे खुनाचा संशय व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांपासून टोका डोलू मज्जी हे भटपर येथे विठ्ठल वत्ते मडावी यांच्या घरी घरजवाई म्हणून राहत होते.दरम्यान गुरुवारी सायंकाळी टोका मज्जी हे आंघोळ करण्यासाठी घराजवळच्या शेतालगत असलेल्या नाल्यावर गेले होते.विशेष म्हणजे घराबाहेर पडताना ते कुणालाही न सांगता बाहेर पडले होते.
advertisement
दरम्यान संध्याकाळची रात्र होत आली, पण टोका डोलू मज्जी काय घरात परतले नव्हते.अनेक ठिकाणी शोधाशोध केली पण ते कुठेच सापडले नाही. त्यानंतर आज पहाटे पून्हा शोधशोध केली असता शेतातील नाल्यात रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह स्थानिकांनी पाहिला होता.त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच घटनास्थळ पाहता टोका डोलू मज्जी यांच्या खुनाचा संशय येत आहे.त्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे. या रिपोर्टमधून आता मृत्यूमागचं नेमकं कारण समोर येणार आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
