त्यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात, उत्तम आरोग्य लाभते तसेच कामात यश मिळते. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. मात्र सूर्यदेवाची पूजा करताना अनेकदा काही चुका होतात किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा कशी करावी? महत्त्व काय आहे?याविषयीची माहिती विशाल कुलकर्णी गुरुजी यांनी 'लोकल 18' ला दिली आहे.
advertisement
विशाल कुलकर्णी यांनी सांगितलं की, रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्त- सप्तमी आणि आरोग्य सप्तमी अशा विविध नावांनीही ओळखले जाते. यंदा सप्तमी तिथी 24 जानेवारीला मध्यरात्री 12 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल आणि 25 जानेवारीला रात्री 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथी सूर्यदेवाच्या उदयावर आधारित असल्याने रथसप्तमीचा मुख्य दिवस 25 जानेवारी हाच मानला जातो. या दिवशी सकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून 7 वाजून 13 मिनिटांपर्यंतचा काळ स्नानासाठी शुभ मानला जातो. या वेळेत स्नान केल्यास पुण्यफळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच सूर्यदेवांची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंतचा काळ शुभ असल्याचं मानलं जातं.
रथसप्तमी दिवशी सूर्य देवाची पूजा कशी करावी?
रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करावे. शक्य असल्यास गंगा किंवा पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले जाते. त्यानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करून पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाची पूजा करावी. तांब्याच्या कलशात पाणी, अक्षदा आणि फुले घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.सूर्यदेवाला अर्घ्य देताना 12 आदित्यांची नावे घेणे अत्यंत शुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार कश्यप ऋषी आणि अदितीचे हे बारा पुत्र असून ते सूर्याच्या बारा वेगवेगळ्या रूपांचे प्रतीक आहेत. ही रूपे वर्षातील बारा महिन्यांचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप केल्यास विशेष फलप्राप्ती होते.पूजेदरम्यान तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती, लाल फुले, फळे आणि मिठाई अर्पण करावी. रथसप्तमीच्या दिवशी व्रत किंवा उपवास करण्यालाही महत्त्व आहे. तसेच या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य लाभते. लाल वस्त्रे, धान्य, तांबे आदी वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.





