गोंदिया जिल्ह्यातील देवरी-चिचगड मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीचा एक विचित्रच अपघात घडला आहे.या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचे धडापासून मुंडके वेगळे झाले आहे. ही घटना सालईजवळ घडली. मात्र या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचे धडापासून मुंडके वेगळे झाल्याने हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. निकेश आत्माराम कराडे (३२) रा. मोहगाव, ता. देवरी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, निकेश हा आपल्या दुचाकीने देवरीवरून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान सालईजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात निकेशचे धडापासून मुंडके वेगळे झाले होते. विशेष म्हणजे एखादा अपघात झाल्यास एक तर दुचाकी चालकांचे प्रचंड नुकसान होते. आणि चालकाला गंभीर स्वरूपाची दुखापत होते. मात्र या घटनेत थेट शीरच धडापासूव वेगळे झाले आहे. त्यामुळे नेमका या तरूणासोबत अपघात झाला आहे की घातपात असा प्रश्न उपस्थित होतोय.
ही संपूर्ण घटना पाहता ही हत्याच असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण कोणत्याही अपघातात शीर धडापासून वेगळे होण्याची शक्यता कमीच असते. जरी असं गृहीत धरलं की अपघातामुळे शीर धडापासून वेगळं झालंय.तर या प्रकरणात मृतदेह चिरडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या प्रकरणात अपघाताचा बनाव रचून हत्या केल्याचा संशय होतो.कारण अपघातात दुचाकीला फारसं नुकसान झालं नाही. त्यामुळे हा संशय व्यक्त होतो आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास करायला सुरुवात केली आहे. या घटनेने गोंदिया हादरली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.
