या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार प्रकरणातील कुख्यात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात पाठलाग करून आरोपींना अटक केली. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाई असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी आरोपी ओंकारला बीडमधून तर अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागरला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. मनीष क्षीरसागर आणि अक्षय आठवलेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मागील आठवड्यात त्यांनी डोंगरे कुटुंबावर बेछूट गोळीबार केला होता, यात विश्वास डोंगरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.
advertisement
आरोपींनी जुन्या वादाची कुरापत काढून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता तीन आरोपींना अटक केल्यामुळे गोळीबाराचं खरं कारण समोर येऊ शकतो. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपी अजून मोकाट आहेत. त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहेत. अशात बीडमध्ये मागच्या आठवड्यात घडलेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांना मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे.