पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय पीडित महिला दोन मुलींची आई आहे. ती नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलीसोबत वास्तव्याला आहे. पीडितेचा पती मद्यपी असून तो दुसऱ्या बाहेरगावी वास्तव्याला असतो. दहा वर्षांपूर्वी पीडितेची चालक असलेल्या आरोपीसोबत ओळख झाली होती. नंतरच्या काळात या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.
यानंतर आरोपीनं पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि याचे अश्लील व्हिडीओज शूट केले. हेच व्हिडीओज व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडित महिलेच्या मोठ्या मुलीला लक्ष्य केलं. आईचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या मुलीचेही अश्लील व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ दाखवून त्याने पुन्हा पीडित महिलेला ब्लॅकमेल केला. मागील अनेक महिन्यांपासून आरोपी अशाच प्रकारे ब्लॅकमेल करत मायलेकींचं लैंगिक शोषण करत होता.
advertisement
आईची बदनामी टाळण्यासाठी मुलीनं देखील आरोपीच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. त्याने वारंवार मुलीसह आईचं लैंगिक शोषण केलं. पीडित मायलेकींनी सगळ्या मागण्या मान्य करूनही आरोपीचं मन भरलं नाही. त्याने दोघींचे अश्लील व्हिडीओज इन्स्टाग्रामवर अपलोड केले. यानंतर हा सगळा प्रकार पीडितेच्या लहान मुलीच्या लक्षात आला. यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
