बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आठवडी बाजारात एका ३२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतक युवकाचे नाव नितीन नामदेव गायकवाड ऊर्फ गोलू (३२) आहे. तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील आहे.
सध्या शेगावातील नागझरी रोडवरील तीन पुतळा परिसरात वास्तव्यास होता. त्याच्याविरोधात विविध ठिकाणी तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. जुन्या वादामुळेच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी साक्षीदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, घटनेनंतर आठवडी बाजारात गर्दी झाली होती.
advertisement
आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
आरोपी आणि मृतक हे सोबतच राहत होते. आपसात वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी कसाबच्या दुकानातील सुरा घेऊन नितीनच्या गेल्यावर सपासप वार केले आहेत. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतली आहे.. हल्लेखोर पसार झाले आहे. आरोपीच्या शोधासाठी पथके त्याच्या मागावर आहे.
अंढेऱ्यात खून , युवकाची निर्घृण हत्या
बुलढाणा जिल्ह्यात खुनांच्या मालिकेने थैमान घातले देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे आकाश उत्तम चव्हाण (वय २५, रा. आसोला बु) या युवकाची निर्दयपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे हा खून अंढेरा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे! मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी म्हणून अयान सय्यद नासीर (वय अंदाजे १८) याचे नाव पुढे आले आहे. अंढेरा बाजार गल्ली परिसरात उघड्यावरच ही हत्या करण्यात आली. तीक्ष्ण शस्त्राने केलेल्या हल्ल्यात आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर संपूर्ण गावात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे. खुनाची वार्ता मिळताच मेहकरचे उपविभागीय अधिकारी खर्डे आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराला वेढा घालून तपास सुरू केला आहे.
