TRENDING:

पतीने हातपाय बांधले, दीराने डोक्यात घातला रॉड, नागपुरात डॉक्टर महिलेची क्रूर हत्या

Last Updated:

Crime in Nagpur: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसर महिलेचा तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसर महिलेचा तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घरात आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर रॉडने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, हुडकेश्वर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला.
News18
News18
advertisement

सुरुवातीला ही हत्या चोरीच्या कारणातून झाल्याचा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर मयत महिलेच्या डॉक्टर पतीने आणि तिच्या दीराने केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

advertisement

डॉ. अर्चना राहुले असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावं आहे. मयत अर्चना यांचे पती अनिल राहुले हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. ते आठवड्यातून एक-दोन दिवस नागपुरात येत असतात. बाकी दिवस ते रायपूरमध्ये राहून नोकरी करतात. पण मागच्या काही काळापासून अर्चना यांचे बाहेरील एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिल यांना होता. याच कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

advertisement

घटनेच्या वेळी आरोपी अनिल आणि मयत अर्चना यांच्यात याच कारणातून वाद झाला होता. या वादानंतर आरोपी पतीने अर्चना यांचे हातपाय बांधून ठेवले तर त्याच्या भावाने अर्चना यांच्या डोक्यावर रॉड मारला. हा हल्ला वर्मी लागल्याने अर्चना जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

त्यानंतर शनिवारी सायंकाळी अनिल नागपुरात आले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीची घरात हत्या झाल्याची माहिती दिली. डोक्यात रॉडने मारहाण करून हत्या केल्याचं त्यांनी शेजाऱ्यांना सांगितलं. सुरुवातीला शेजाऱ्यांना देखील अनिलच्या बोलण्यावर विश्वास बसला. कारण अनिल हे आठवड्यातून दोनच दिवस घरी येत असल्याने ते घरी नसताना ही हत्या झाली असावी, असं शेजाऱ्यांना वाटलं. पण खोलात जाऊन तपास केला असता आरोपी पती अनिल आणि त्याचा भाऊ रवी यांनीच ही हत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत अर्चना यांना एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
पतीने हातपाय बांधले, दीराने डोक्यात घातला रॉड, नागपुरात डॉक्टर महिलेची क्रूर हत्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल