TRENDING:

crime news : लेक चांगली शिकावी म्हणून कॉलेजला पाठवलं अन् ती मुलासोबत पळून गेली, आई-वडील जागीच संपले!

Last Updated:

प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केला की काही तरुण-तरुणी घरातून पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. आपल्या संगोपनासाठी पालकांनी किती कष्ट घेतले, याची जाणीव नसते...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
केरळ : प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केला की काही तरुण-तरुणी घरातून पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. आपल्या संगोपनासाठी पालकांनी किती कष्ट घेतले, आपल्या या निर्णयामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होईल, याचा विचार न करता मुलं-मुली घरातून पळून जातात. केरळमधल्या कोळ्ळम जिल्ह्यात असंच एक प्रकरण समोर आलं आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, उन्नीकृष्ण पिल्लई आणि बिंदू पिल्लई यांची मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. तिचं कॉलेजमधल्या एका मुलावर प्रेम होतं. कुटुंबीयांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी विरोध केला. मुलीचा प्रियकर तिच्यासाठी योग्य नसल्याचं पिल्लई दाम्पत्याचं मत होतं. त्यामुळे त्यांनी या नात्याला विरोध केला होता.

आई-वडिलांचा विरोध पाहून एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली. यामुळे उन्नीकृष्ण आणि बिंदू पिल्लई दु:खी झाले आणि नैराश्यात गेले. त्यांची स्थिती एवढी वाईट झाली होती, की त्यांना औषधोपचारांचा आधार घ्यावा लागला. या औषधांच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. पिल्लई दाम्पत्य कोळ्ळम जिल्ह्यातल्या पावुंबा इथलं रहिवासी आहे. मुलीच्या रिलेशनशिपमुळे हे दाम्पत्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतं, असं पोलिसांनी सांगितलं.

advertisement

गेल्या वर्षी केरळमधल्या तिरुवनंतपुरममध्ये प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. एका 28 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केली होती. लग्नासाठी तिच्या प्रियकराने हुंड्याची मागणी केली होती. पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली होती. मृत शहाना ही तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमधील शस्त्रक्रिया विभागात पीजीची विद्यार्थिनी होती. 5 डिसेंबर 2023 रोजी कॉलेजजवळच्या भाड्याच्या घरात ती मृतावस्थेत आढळली होती. ती आरोपी डॉक्टर ई. ए. रुवाईजशी लग्न करणार होती.

advertisement

शहानाच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता, की हुंडा म्हणून तिच्याकडे सोनं, जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. शहानाच्या कुटुंबाला एवढा हुंडा देणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र त्यानंतर पोलिसांना शहानाच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली होती. तिच्याकडे हुंडा आणि मालमत्तेची मागणी केल्याचं यातून स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी प्रियकराची आरोपी म्हणून नोंद केली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

या प्रकरणात आरोपी बनवल्यानंतर मेडिकल असोसिएशनने रुवाईजला प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं होतं. केरळ पोलिसांनी सांगितलं होतं, की शहाना आणि रुवाईज हे मित्र होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिरुअनंतपुरम इथल्या वेंजरामुडू येथे राहणाऱ्या तिच्या कुटुंबाची हुंडा देण्याची स्थिती नव्हती. त्यामुळे आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी महिला आणि बालकल्याण विभागाला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
crime news : लेक चांगली शिकावी म्हणून कॉलेजला पाठवलं अन् ती मुलासोबत पळून गेली, आई-वडील जागीच संपले!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल