TRENDING:

मुलाच्या वाढदिवसाला दिली मित्रांना पार्टी, पण जिवाभावाच्या मित्रानेच केला घात; जेवताना...

Last Updated:

पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाने आनंदी वातावरणाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : आनंदाच्या वातावरणात साजरा होणारा वाढदिवस क्षणात दु:खामध्ये बदलला आहे. उदगाव येथील जॅकवेल परिसरात वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच एका तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लखन घावट (वय अंदाजे 30) असं मृत तरुणाचं नाव आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, लखन घावट आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी सहा मित्रांसह उदगावच्या जॅकवेल परिसरात गेला होता. पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाने आनंदी वातावरणाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले.  मात्र, पार्टीदरम्यान एका किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. वाद चिघळत गेला आणि पाहता पाहता आनंदी वातावरणाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले.

उपचारादरम्यान लखनचा मृत्यू

advertisement

या दरम्यान एका मित्राने संतापाच्या भरात लखन यांच्या डोक्यावर मोठा दगड फेकला. यामध्ये लखन गंभीर जखमी झाला. इतर मित्रांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान लखनचा मृत्यू झाला.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून तपास सुरू केला आहे. वादाचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे उदगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाढदिवसाचा आनंद शोकात परिवर्तित झाल्याने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जयसिंगपूर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

हिंगोलीच्या वसमत शहरात किरकोळ कारणातून युवकांमध्ये वाद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

हिंगोलीच्या वसमत शहरातील शुक्रवार पेठ नजीकच्या परिसरात काल रात्री युवकांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाल्याची घटना घडली. या वादातून सिद्धार्थ कांबळे हा युवक व त्याच्या मित्राना नऊ ते दहा जणांनी शिविगाळ करत लोखंडी रॉड, लाकडाच्या सहाय्याने गंभीर मारहाण केली. एवढेच नव्हे तर या युवकाच्या घरात देखील नासधूस करण्यात आली, दगडफेक करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली आहे. या घटनेत एका ध्वजाचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात जवळपास दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जखमी झालेल्या सिद्धार्थ कांबळे सह त्याच्या मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान काल रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सध्या या भागातील परिस्थिती शांततेत आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
मुलाच्या वाढदिवसाला दिली मित्रांना पार्टी, पण जिवाभावाच्या मित्रानेच केला घात; जेवताना...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल