पंजाबव्यतिरिक्त या आरोपीने चंडीगड आणि दिल्लीतल्या तरुणींनाही फसवलं होतं. शारीरिक शोषण केल्यानंतर तो त्या तरुणींना मारपीटही करायचा. जालंधर ग्रामीण पोलिसांनी असा दावा केला आहे, की आतापर्यंत सुमारे 50 तरुणी त्या भामट्याच्या जाळ्यात सापडल्या आहेत. त्यांपैकी अनेकींशी त्याने शारीरिक संबंधही प्रस्थापित केले होते. पीडित तरुणींची तक्रार जालंधर ग्रामीण पोलिसांकडे आल्यानंतर गुरैया ठाण्यातल्या पोलिसांनी आरोपीला अटक केली.
advertisement
हेही वाचा - 11 महिन्यात तिसऱ्यांदा तोंड लपवून वैष्णो देवीला पोहोचला शाहरूख; Video व्हायरल
गुरैया पोलीस ठाण्याचे एसएचओ सुखदेवसिंग यांनी सांगितलं, की एका तरुणीने धीर करून तक्रार दाखल केली. तिने सांगितलं, की कॅनडाचा नागरिक असल्याची बतावणी करून एका तरुणाने दीड लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसंच, आरोपी आणखी 60 हजार रुपये मागत असल्याचं तिने सांगितलं. त्याप्रमाणेच आरोपीने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचंही तिने सांगितलं.
हरपालसिंग असं आरोपीचं नाव असून, तो बर्नाला जिल्ह्यातल्या बिहाला गावचा रहिवासी आहे. हरपालसिंग कधीही कॅनडाला गेलेला नाही; मात्र त्याने आपण कॅनडाचा नागरिक असल्याचं खोटंच सांगून अनेक तरुणींना फसवलं. प्रत्येक तरुणीला तो वेगवेगळं नाव सांगायचा. शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल साइटवर त्याने 'संदीप सिंग, कॅनडा' अशा नावाने प्रोफाइल तयार केलं होतं. एसएचओ सुखदेव सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या फोनमध्ये तरुणींचे जवळपास 50 फोटोज मिळाले. त्या तरुणींना आरोपीने कॅनडात घेऊन जाण्याची स्वप्नं दाखवली होती. आतापर्यंत त्याने तरुणींना जवळपास 60 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर, तरुणींनी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मॅट्रिमोनियल वेबसाइट्सवरच्या सर्वच माहितीवर लगेचच विश्वास न ठेवता, आवश्यक ती पडताळणी करावी. स्वतःची खात्री झाल्याशिवाय प्रत्यक्ष कोणतेही व्यवहार करू नयेत. कोणतीही शंका आल्यास, बनाव वाटल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
