30 आणि 31 डिसेंबरला कोणती एकादशी?
1) 30 डिसेंबर रोजी पुत्रदा एकादशी आहे. ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी केली जाते. या दिवशी उपवास करून प्रामुख्याने भगवान शंकरांची पूजा केली जाते.
2) 31 डिसेंबर रोजी भागवत एकादशी आहे. ही एकादशी भगवान विष्णूंना अर्पण केलेली असून विशेषतः वैष्णव, वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणजेच सलग दोन दिवस एकादशी असल्याने धार्मिकदृष्ट्या हा काळ महत्त्वाचा ठरतो.
advertisement
Tourism : नवीन वर्षानिमित्त फिरायचा प्लॅन? छ. संभाजीनगरमधील कधीही न पाहिलेली 10 ठिकाणं
31 डिसेंबरला मांसाहार करावा का?
आदित्य जोशी गुरुजी सांगतात की, धार्मिक श्रद्धेनुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार केल्यास पुण्य कमी होते आणि पाप लागते, अशी मान्यता आहे. या दिवशी शरीरात तामसिक ऊर्जा वाढते, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक असंतुलन निर्माण होऊ शकते. यामुळे वर्षानुवर्षे साठलेले पुण्य कमी होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी सात्विक अन्न सेवन करून भगवान विष्णूंची पूजा करणे अधिक योग्य मानले जाते.
मांसाहार केला तर पाप लागते का?
गुरुजी स्पष्ट करतात की, प्रत्येक जण धार्मिक नियम पाळेलच असे नाही. ज्यांची श्रद्धा नाही किंवा जे नियम पाळत नाहीत, त्यांनी मांसाहार केल्यास त्याला जबरदस्तीने चूक म्हणता येणार नाही. मात्र शारीरिक आरोग्य आणि मानसिक समतोलासाठी एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थ टाळावेत, असा सल्ला दिला जातो.
31 डिसेंबर रोजी इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन असते. त्याच वेळी एकादशीचा योग असल्याने धार्मिक परंपरा आणि वैयक्तिक आचारधर्म यांचा समतोल राखण्याचा मुद्दा पुढे येतो. आदित्य दीपक जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार, एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घेणे हे शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी उपयुक्त मानले जाते. मात्र प्रत्येकाची श्रद्धा, जीवनशैली आणि आहारविषयक सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे या दिवशी कोणता आहार घ्यायचा याचा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या विचारांनुसार आणि समजुतीनुसार घ्यावा, असेही गुरुजी स्पष्ट करतात.





