advertisement

अस्सल घरगुती मालवणी जेवण, सुरमई ते फिश करी स्वस्तात, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

घरगुती मालवणी चव सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने बोरिवलीतील यज्ञेश सातार्डेकर या तरुणाने आयसी कॉलनी येथे पोटली बाबा हे किचन सुरू केले आहे. आज हे ठिकाण मालवणी जेवणासाठी अनेकांच्या आवडीचे ठरत आहे.

+
स्वस्तात

स्वस्तात मस्त मालवणी जेवण; बोरिवलीतील ‘पोटली बाबा’ला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचीही पसंती

मुंबई : सुरमई, बांगडा, पापलेट असे माशांचे पदार्थ म्हटले की मुंबईकरांच्या तोंडाला हमखास पाणी सुटते. आठवड्याच्या शेवटी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त मालवणी जेवण करण्याचा अनेकांचा बेत असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन आणि घरगुती मालवणी चव सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने बोरिवलीतील यज्ञेश सातार्डेकर या तरुणाने आयसी कॉलनी येथे पोटली बाबा हे किचन सुरू केले आहे. आज हे ठिकाण मालवणी जेवणासाठी अनेकांच्या आवडीचे ठरत आहे.
यज्ञेश सातार्डेकर यांनी चेन्नईमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून त्यांनी काही नामांकित फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम केले आहे. पुढे ते फोटोग्राफी व्यवसाय करत होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये फोटोग्राफीचे काम बंद झाल्यानंतर त्यांनी घरातूनच छोट्या प्रमाणात क्लाऊड किचन सुरू केले. सुरुवातीला घरगुती मालवणी पदार्थ ग्राहकांना देण्यास सुरुवात झाली आणि त्यालाच पुढे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बोरिवलीच्या आयसी कॉलनीत पोटली बाबा सुरू करण्यात आले.
advertisement
या किचनची खासियत म्हणजे घरगुती चवीचे मालवणी पदार्थ. यज्ञेश यांनी कोकणातील घरांमध्ये बनणाऱ्या पदार्थांचा अभ्यास करून मसाले आणि चवीचा समतोल तयार केला आहे. त्यामुळे येथे मिळणाऱ्या पदार्थांमध्ये घरची चव जाणवते. येथे अनेक पदार्थ ग्राहकांसमोर लाईव्ह बनवले जातात. माशांचे पदार्थ डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करून दिले जातात. त्यामुळे माशांची चव आणि ताजेपणा टिकून राहतो.
advertisement
मेनूमध्ये सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, पापलेट फ्राय, फिश करी, चिकन मालवणी असे अनेक पदार्थ मिळतात. त्यासोबत सोलकढीही दिली जाते. मालवणी जेवणासोबत भाकरी हा नेहमीचा पर्याय असतो, मात्र येथे भाकरीसोबत आंबोळी आणि घावणे हेही पर्याय दिले जातात. भाकऱ्या देखील येथेच ताज्या बनवल्या जातात.
advertisement
येथील आणखी एक खास गोष्ट म्हणजे पोटली. पोटली म्हणजेच मालवणी थाळी. ही थाळी सुंदर पद्धतीने सजवून ग्राहकांना दिली जाते. या पोटलीची सुरुवात सुमारे साडेसातशे रुपयांपासून होते आणि त्यामध्ये विविध मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
advertisement
यज्ञेश यांच्या या चवीला केवळ सर्वसामान्य ग्राहकांचाच नव्हे तर अनेक कलाकारांचाही प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय मराठी कार्यक्रमातील काही कलाकारही येथे खास मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तसेच काही कार्यक्रम, पार्टी किंवा खास प्रसंगी या किचनमधून जेवण मागवले जाते.
 
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
अस्सल घरगुती मालवणी जेवण, सुरमई ते फिश करी स्वस्तात, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement