बांदा पोलीस ठाणे येथे पती सतीश याच्यावर सोमवारी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे करत आहेत. रोणापाल येथील गुराखी पांडुरंग गावकर यांना ही महिला जंगलात पहिल्यांदा दिसली होती. मंगळवारी दिवसभर बांदा पोलीस ठाण्याचे विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने रोणापाल येथील जंगलात जात तपास केला. ती महिला कुठून आली? तिला इथे कसं आणण्यात आलं?कसं बांधण्यात आलं? याची सखोल माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत.
advertisement
या प्रकरणी पोलीसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. तिच्या पतीविरोधात आता बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचं मोठं आव्हान सिंधुदुर्ग पोलीसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथकं तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासकामी गेली. तेथील तपासानंतर सत्यता समोर येणार आहे. तर पतीला ताब्यात घेतल्यानंतर त्या महिलेला कधी आणि का बांधण्यात आलं? ह्याचा उलगडा होणार आहे.
Crime News : पत्नीच्या आजारपणाला कंटाळला पती; हत्या केल्यानंतर थेट पोलिसांनाच फोन केला...
सध्या ती महिला गोव्यातील बांबूळी येथील रुग्णालयात अधिक उपचार घेत आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. प्रत्यक्षात गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार एक-दोन दिवस आधी जंगलातून तिच्या ओरडण्याचा आवाज गुराख्यांना येत होता. पण जंगलात एखादं जनावर ओरडत असावं म्हणून गावातील गुराख्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण शनिवारी तिसऱ्या दिवशी या जंगलात गुरे घेऊन गेलेल्या पांडुरंग गावकर या गुराख्याला तिच्या ओरडण्याचा आवाज आला. यावेळी गुराखी पांडुरंग गावकर आणी निलेश मोर्ये यांना ती पहिल्यांदा दिसली.
यानंतर ती माहिती त्यांनी उपसरपंच भरत गावकर यांना दिली. ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी बांदा पोलीसांना देताच बांदा पोलीस आणी स्थानिक गावकरी यांनी त्या महिलेची सुटका केली .
