या प्रकरणी तीन मुलींसह स्पा सेंटरचा मॅनेजर आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेतलं आहे. अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पोलीस पथकाने ही कारवाई केली. अमरावतीच्या नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पा ९९ या सेंटरमध्ये मसाज थेरीपीच्या नावावर चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत तीन मुली, स्पा सेंटरचा व्यवस्थापक व दोन ग्राहकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कॅम्प मार्गावर नेक्स्ट लेव्हल मॉल आहे. या मॉलच्या पहिल्या मजल्यावर स्पा ९९ नावाचे मसाज सेंटर आहे. या सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मसाज थेरेपीच्या नावावर चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाचा पोलिसांनी भंडाफोड केलाय. गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने स्पा ९९ या सेंटरवर धाड टाकत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघाविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमरावतीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कारवाई संदर्भात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
