गप्पा रंगल्या अन् वाद झाला
समोर आलेल्या वृत्तानुसार, प्रियांशु आणि ध्रुव शाहू हे मित्र होते. शाहूने प्रियांशुला त्याच्या घरी बोलावले होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी एकत्र दारू प्यायली. गप्पा रंगल्या अन् वाद झाला. त्यानंतर दोघांनी दारूच्या नशेत एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याला चाकूने भोसकून ठार मारलं. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली.
advertisement
गळ्यावरच वार अन् प्रियांशू कोसळला
आरोपीला प्रियांशुच्या शरीरावर चाकूने वार केले. त्यानंतरही त्याला तो जिवंत असल्याचा संशय आला, त्याने त्याच्यावर दगड फेकला आणि तो पुन्हा झोपी गेला. गळ्यावरच वार झाल्याने प्रियांशू कोसळला होता. त्या सकाळी पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्याला खात्री झाली की, प्रियांशुचा मृत्यू झालाय.
राबवत शाहूला अटक
दरम्यान, आरोपीने त्याला वायरने करकचून बांधले आणि फेकून दिलं. वस्तीतील लोकांना पहाटे तो वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा प्रियांशू शाहूसोबत बाहेर गेला होता अशी माहिती कळाली. पोलिसांनी शोधमोहीम राबवत शाहूला अटक केली आहे.