या गंभीर घटनेने ब्रिटनमधील भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या घटनेला 'वांशिकदृष्ट्या प्रेरित' हल्ला मानले असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदतही मागितली. संशयित आरोपी स्थानिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यापैकी एकाने गडद रंगाचा स्वेटशर्ट परिधान केला होता आणि त्याने टक्कल केलं होतं, अशी माहिती पीडितेने दिली आहे.
advertisement
सँडवेल पोलीस प्रमुख अधीक्षक किम मॅडिल यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, "आम्ही या प्रकरणाची संपूर्ण गांभीर्याने चौकशी करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, फॉरेन्सिक तपास करणे आणि इतर सर्व आवश्यक तपास सुरू आहेत. आम्ही पीडित तरुणीला सर्वतोपरी मदत करत आहोत आणि तिला मानसिक आधार देत आहोत."
या घटनेमुळे ब्रिटनमधील वांशिक भेदभावाचा आणि द्वेषाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थानिक भारतीय समुदायाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा एक 'लक्ष्यित हल्ला' असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.