तुलसी परते असं 35 वर्षीय मयत शिक्षकाचं नाव आहे. ते मध्यप्रदेशातील कारंजा येथील रहिवासी होते. तसेच ते विदिशा याठिकाणी शिक्षक म्हणून काम करत होते. घटनेच्या दिवशी तुलसी हे आपली पत्नी आणि मुलांसह मध्यप्रदेशातील कारंजा येथून विदिशा येथे जात होते. त्यासाठी ते आमगाव रेल्वे स्टेशनवर आले होते.
रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तुलसी यांचा आपल्या पत्नीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात तुळसी यांनी रेल्वेच्या समोर उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यांनी पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत आयुष्याचा शेवट केला. त्यांनी छत्तीसगड एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रेल्वे पोलीस गोंदिया करीत आहेत.
advertisement
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
Jun 02, 2025 8:58 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नी-मुलं पाहत राहिली, शिक्षकाने भरधाव रेल्वेसमोर मारली उडी, कारण वाचून बसेल धक्का
