दबा धरून बसलेल्या वाघाचा मागूल हल्ला
सविस्तर बातमी अशी की, प्रवीण सुखराम बेलसरे (वय-17) आणि त्याचा मित्र गोविंद कासदेकर गुरे चारण्यासाठी जांभळी परिसरात गेले होते. हा परिसरात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागांतर्गत येतो. गुरे चारून झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता घरी परतू लागले. पण वाटेतच एका महादेवाचे मंदिर होते, त्यादिवशी श्रावण सोमवारदेखील होता. त्यामुळे कपारीतील महादेवाच्या दर्शनाला गेले, दर्शन घेऊन पुन्हा घराच्या दिशेने निघाले. तर वाटतेच पाठीमागून प्रवीणवर वाघाने हल्ला चढवला आणि त्याला जागीत ठार केला. हल्लावेळी गोविंदने पळ काढला, त्यामुळे त्याचा जीव वाचला.
advertisement
2 पाय आणि एक हात पूर्णपणे खाल्ला
गावात जाऊन गोविंदने घडलेला प्रकार सांगितला. गावकऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट दिली असता, प्रवीणचा मृतदेह ताराबल्डा जंगलापर्यंत वाघाने फरपटत नेल्याचे दिसून आले. त्यात त्याचे दोन्ही पाय आणि एक हात वाघाने खाल्ल्याचे दिसून आले. या घटनेने गावात वाघाची दहशत पसरली आहे, लवकरात लवकर वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
हे ही वाचा : मध्यरात्री उठला, बायकोचा गळा आवळला अन् स्वतःही गळफास घेतला; एका व्यसनाने संसार उद्ध्वस्त झाला!
हे ही वाचा : चिपळूणमध्ये थरार! मित्र-मैत्रिणीच्या वादात 5 जणांचा बळी; धावत्या जीपमधून उडी, थरारक पाठलागाचा दुर्दैवी शेवट