चिपळूणमध्ये थरार! मित्र-मैत्रिणीच्या वादात 5 जणांचा बळी; धावत्या जीपमधून उडी, थरारक पाठलागाचा दुर्दैवी शेवट

Last Updated:

'बचाव...बचाव', म्हणत तरुणीने धावत्या जीपमधून उडी मारली. पुढे जीप चालणारा तिचा तरुण मित्र वेगाने गाडी चालवू लागला. मागून ही तरुणी एका चारचाकीमध्ये बसली आणि...

Chiplun News
Chiplun News
चिपळूण : 'बचाव...बचाव', म्हणत तरुणीने धावत्या जीपमधून उडी मारली. पुढे जीप चालणारा तिचा तरुण मित्र वेगाने गाडी चालवू लागला. मागून ही तरुणी एका चारचाकीमध्ये बसली आणि जीपचा पाठलाग करू लागली. मैत्रिणी कोणासोबत तरी आपला पाठलाग करतीय म्हणून जीपचालक तरुणाने आणखी वेगाने गाडी पळवली. पुढे जाऊन त्याने एका रिक्षाला धडक दिली आणि आपल्यासोबत फरपटत नेलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. जीप आणि ट्रकच्यामध्ये रिक्षा चेपली गेली. या विचित्र अपघातात जीपचालक तरुण, रिक्षाचालक आणि रिक्षातील प्रवासी दाम्पत्य अन् त्यांचा 4 वर्षांचा मुलगा अशा 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
मित्र-मैत्रिणीच्या वादात गमवला 5 जणांनी जीव
संबंधित धक्कादायक अपघात पिंपळी येथील पुलावर रात्री 10 च्या सुमारास घडला. यामध्ये जीपचालक आसिफ हाकीमुद्दीन सैफी (वय-28, डेहराडून, उत्तराखंड), रिक्षाचालक इब्राहिम इस्माइल लोणे (वय-62, रा. पिंपळी), रिक्षातील प्रवासी नियाज महंमद हुसेन सय्यद (वय-50) आणि शबाना नियाज सय्यद (वय-40) आणि हैदर नियाज सय्यद (वय-4, सर्व. रा. पर्वती, पुणे) या पाच जणांचा मृत्यू झाला. नियाज आणि शबाना यांचा मुलगा पिंपळी येथे मदारशामुळे शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी सय्यद कुटुंबिय आले होते. त्याला भेटून पुण्यासा परतत असताना त्यांचा अपघात झाला.
advertisement
...असा घडला संपूर्ण नाट्यमय आणि थरारक प्रकार
जीपचालक आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला गेला होता. गोव्यावरून येत असताना दोघांच्यात वाद झाले. त्यामुळे मैत्रिणीने जीपमधून उतरण्याचा हट्ट केला. चिपळूणपर्यंत त्यांचा हा वाद सुरू होता. शेवटी हा वाद टोकाला गेला आणि त्या तरुणीने धावत्या गाडीतून उडी मारली. तिचा मित्र गाडी न थांबवता कराडच्या दिशेने गाडी सुसाट नेऊ लागला. तेवढ्यात मागे उडी मारलेल्या मैत्रिणीने एका कारचालकाला थांबवून त्याच्या गाडीत बसली आणि त्याला सांगितलं की, "एका मुलाने माझी चोरून नेली आणि त्याचा पाठलाग करा." पाठलाग सुरू झाला. त्यातून जीपचालक मित्राने गाडी वेगाने पळवली आणि पुडे पिंपळी पुलावर भयानक अपघात झाला. सध्या पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
चिपळूणमध्ये थरार! मित्र-मैत्रिणीच्या वादात 5 जणांचा बळी; धावत्या जीपमधून उडी, थरारक पाठलागाचा दुर्दैवी शेवट
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement