मध्यरात्री उठला, बायकोचा गळा आवळला अन् स्वतःही गळफास घेतला; एका व्यसनाने संसार उद्ध्वस्त झाला!

Last Updated:

नवरा-बायकोमध्ये भांडण झालं. रिक्षाचालक असणाऱ्या दारुड्या पतीने मध्यरात्री रात्री झोपलेल्या बायकोचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि...

Crime News
Crime News
सिडको (नाशिक) : नवरा-बायकोमध्ये भांडण झालं. रिक्षाचालक असणाऱ्या दारुड्या पतीने मध्यरात्री रात्री झोपलेल्या बायकोचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि स्वतःही साडीने गळफास घेऊन आत्महत्या केला, ही धक्कादायक घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरात घडली.
बायको भांडणाला वैतागली अन् निघून गेली
चेतन नाना माडकर (वय-33) आणि स्वाती चेतन माडकर (वय-27) अशी मृतांची नावे आहेत. समोर आलेली माहिती अशी की, रिक्षाचालक असणाऱ्या चेतनला दारूचं व्यसन होतं. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये सतत वाद होत होते. सततच्या भांडणामुळे बायको वैतागून मुलांना घेऊन आईच्या घरी राहण्यास आली. अधूनमधून चेतन मुलांना भेटण्यासाठी येत-जात होता.
advertisement
पुन्हा संसार थाटला, पण...
सासूला वाटलं की, जावई आता सुधारला आहे. त्यामुळे तिने जावई आणि मुलीने पुन्हा संसार करावा, यासाठी चुंचाळे परिसरातच एक खोली भाड्याने घेऊन दिला. स्वाती एका खासजी कंपनीत काम 3 मुलांचा सांभाळ करत होती. सोमवारी रात्री त्या दोघांच्यात पुन्हा भांडण झालं. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना चेतनने ओढणीने बायकोचा गळा आवळला, त्यात स्वातीचा मृत्यू झाला. त्यानंतर चेतनने स्वतःही आत्महत्या केली. या घटनेत दारूच्या व्यसनामुळे 3 मुलं अनाथ झाली, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मध्यरात्री उठला, बायकोचा गळा आवळला अन् स्वतःही गळफास घेतला; एका व्यसनाने संसार उद्ध्वस्त झाला!
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement