वसई, 7 ऑगस्ट : आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला सर्वात सुखद क्षण असतो. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात आई-वडील होण्यासाठी कित्येक जोडपे वैद्यकीय उपचार घेतात. मात्र अशातच विविध ठिकाणांहून कचराकुंडीत, नदीकिनारी नवजात अर्भक आढळल्याच्या संतापजनक घटना समोर येतात. वसईतही अशाच एका घटनेने खळबळ उडाली आहे.
वसई पश्चिम भागातील ग्रामीण परिसरात असलेल्या दोस्ती पर्ल सोसायटीच्या कचराकुंडीत नवजात अर्भक आढळलं. सकाळी सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचराकुंडीत अर्भक पाहून धक्काच बसला. त्यांनी तातडीने याबाबत वसई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अर्भक ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
advertisement
अरेच्चा, जन्मतःच बाळाला 2 दात; डॉक्टर म्हणाले...
दरम्यान, हे अर्भक केवळ दोन ते तीन महिन्यांचं असून पुरुष जातीचं असल्याचं कळतं आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कचराकुंडी दोस्ती पर्ल सोसायटीची होती. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांपैकी कोणी अर्भक याठिकाणी टाकलं की, कोणी बाहेरून आलेल्या व्यक्तीने हे दुष्कृत्य केलं, याचा तपास पोलीस करत आहेत.
