पण तिला रुग्णालयात खडसावून विचारलं असता तिने हत्येची कबुली दिली. प्रेमात अडथळा ठरत असल्याने पतीला मारल्याचं देखील सांगितलं. ही घटना नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चंद्रसेन रामटेके असं हत्या झालेल्या ३८ वर्षीय पतीचं नाव आहे. तर दिशा चंद्रशेन रामटेके आणि तिचा प्रियकर आसिफ इस्लाम अन्सारी अशी आरोपींची नावं आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय दिशा रामटेके हीचं चंद्रसेन यांच्याशी तेरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून तो घरीच बसून होता. दरम्यानच्या काळात घरखर्च भागवण्यासाठी दिशाने पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय सुरू केला. याच काळात तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
पण दिशाचा पती चंद्रसेन दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. याच कारणातून दोघांनी चंद्रसेनची हत्या करण्याचा प्लॅन केला. घटनेच्या दिवशी 4 जुलैला चंद्रसेन घरात निपचित पडून होता. दिशाने चंद्रसेनचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाल्याचा बनाव रचला. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चंद्रसेनचा गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झालं.
पोलिसांनी शासकीय रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम कक्षाजवळ दिशाला बोलवून तिची खडसावून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. अनैतिक संबंधांची चंद्रसेन याला माहिती मिळाली होती. यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यातूनच प्रियकर आसिफसोबत मिळून चंद्रसेनचा गळा आवळला आणि नाकावर उशी दाबून धरली. श्वास घेता न आल्याने चंद्रसेनचा तडफडून मृत्यू झाला, अशी कबुली आरोपी महिलेनं दिली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.