बलिया : गेल्या काही दिवसांत अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्या घटनांही वाढत आहेत. तसेच पती पत्नीच्या वादाच्याही घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच मुलगी आणि 5 लाख रुपये घेऊन पत्नी घरातून फरार झाली. 5 महिन्यांपासून पती आपल्या फरार झालेल्या पत्नीचा शोध घेत भटकत आहे. लोकल18 च्या टीमशी बोलताना पतीने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
advertisement
काय आहे संपूर्ण घटना -
एका व्यक्तीची पत्नी मुलीला सोबत घेत फरार झाली आहे. मागील 6 महिन्यांपूर्वी ही घटना घडली. मात्र, अजूनही ही महिला सापडली नाही. तर 6 महिन्यांपूर्वी पत्नी फरार झाली असूनही पतीने तिच्याप्रती आपल्या मनात प्रेम असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील ही घटना आहे. पत्नीची वाट पाहत असलेल्या पतीने लोकल18 शी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
संजय उपाध्याय असे या व्यक्तीचे नाव आहे. ते बलिया येथील आर्य समाज रोड परिसरातील रहिवासी आहेत. संजय उपाध्याय हे 2006 पासून वकील म्हणून काम करतात. मागील 6 महिन्यांपासून ते आपल्या पत्नीचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप तिचा शोध लागलेला नाही. ती नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. सर्व कामे स्वत:च करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेकांना माहिती नसेल, घातक आजारांवर उपचारासाठी होतो सापाच्या विषाचा वापर
संजय उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वी एका खासगी मॉलमध्ये काम करत होती. ते कामानिमित्त बाहेर होते. मात्र, घरी आल्यावर त्यांची पत्नी सर्व दागिने, 5 लाख रुपये आणि एकुलती एक मुलगी घेऊन घरातून फरार झाली आहे, असे त्यांना कळले. तेव्हापासून आपल्या मुलीचा चेहराही पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. तु जिथे कुठे असशील परत ये. तुझ्याविना मी खूप संकटात आहे. मी तुला काहीच नाही बोलणार, या शब्दात त्यांनी लोकल18 शी बोलताना आपल्या पत्नीला परत येण्याचे आवाहन केले.