अनेकांना माहिती नसेल, घातक आजारांवर उपचारासाठी होतो सापाच्या विषाचा वापर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
साप एक असा प्राणी आहे, ज्याला सर्वजण घाबरतात. भारतासह जगभरात दरवर्षी सर्पदंशाने सुमारे 1 लाख 25 हजार जणांचा मृत्यू होतो. मात्र, दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेणारे तेच विष आता जीवरक्षक औषधांच्या निर्मितीमध्ये वापरले जात आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा स्पेशल रिपोर्ट. (आशिष कुमार, प्रतिनिधी, पश्चिम चम्पारण)
मागील 22 वर्षांपासून वन्यजीवांवर काम करणारे तज्ज्ञ स्वप्नील खताळ यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सापाचे विष प्रोटीनपासून तयार होते. हीमो टॉक्सिन, न्यूरोटॉक्सिन, माया टॉक्सिन किंवा सायटोकाइन, या विषामध्ये आढळणारे प्रोटीन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. विशेष म्हणजे, केवळ सापच नाही तर विंचू, कोळी यांसारख्या इतर विषारी प्राण्यांच्या विषाचाही औषधी बनवण्यासाठी वापर केला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement